Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार राहुल कुल यांना धक्का  

भीमा पाटस कारखान्यावर कारवाई, साहित्य जप्त करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश

पुणे/प्रतिनिधी ः भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी कारखान्याप्रकरणी गंभीर आर

टॉवेल खरेदी करणे पडले सहा लाख रुपयाला
अभिनेत्री तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात
शेंद्रे-कागल महामार्गाच्या टोलवसुलीसाठी 53 दिवसांची मुदतवाढ

पुणे/प्रतिनिधी ः भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी कारखान्याप्रकरणी गंभीर आरोप करत त्यांनी 500 कोटींचे मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी राहुल कुल अध्यक्ष असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याचे साहित्य जप्त करा, असा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे 5 कोटी 78 लाख रूपये थकवले आहेत. याबाबत शेतकर्‍यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ही कारवाई केली आहे. साखर आयुक्तांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचे साहित्य जप्त करा, असे आदेश दिले आहेत. तसेच, शेतकर्‍यांच्या थकीत रकमेबाबत तातडीने खुलासा करावा, अशी नोटीस बजावली आहे. शेतकर्‍यांचे थकीत पैसे कधी देणार? याबाबत तातडीने उत्तर द्या, अशी विचारणाही साखर आयुक्तांनी कारखान्याला पाठवलेल्या नोटीशीमध्ये केली आहे. राहुल कुल हे पुण्यातील दौंड तालुक्यातील भाजपचे आमदार आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत.

राऊतांनी केले होते 500 कोटींच्या मनी लॉड्रिंगचे आरोप – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. राहुल कुल यांनीच हा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी भीमा सहकारी कारखान्यावर कारवाई करताच संजय राऊतांनी राहुल कुल व भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, भीमा पाटस कारखान्यावर कारवाई हा शेतकर्‍यांच्या लढ्याचा हा विजय. आमदार राहुल कूल यांना वाचवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत आमदार कूल यांना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS