Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करंजी ते बोकटा रस्ता डांबरीकरणासाठी बच्चुभाऊ कडू यांना निवेदन

कोपरगाव प्रतिनिधीः तालुक्यातील करंजी ते बोकटा शिवापर्यतचा ग्रामिण मार्ग 75 लांबी 4.5 किमीचा रस्ता ग्रामीण भागातील समस्त गावकरी, शेतकरी आणि विद्या

नेवाशातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले
काळे कारखान्याकडून ऊसतोडणी कामगारांची केली आरोग्य तपासणी
LOK News 24 I लॉकडाउनला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

कोपरगाव प्रतिनिधीः तालुक्यातील करंजी ते बोकटा शिवापर्यतचा ग्रामिण मार्ग 75 लांबी 4.5 किमीचा रस्ता ग्रामीण भागातील समस्त गावकरी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आणि दैनंदिन दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असुन हा रस्ता तात्काळ मजबूतीकरण करण्यात यावे. यासाठी कोपरगाव तालुका प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांना देत केली आहे.
निवदेनात म्हटलें आहे की, कोपरगाव तालुक्यातील करंजी ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बोकटा, अंदरसुल या गावांना, जिल्ह्याच्या सिमांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून, या भागातील शेतकरी, विद्यार्थी, तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी कांदा तसेच इतर बाजारपेठेंच्या दृष्टीने शेतकर्‍यांना दळणवळण करणार्‍यांसाठी हा रस्ता जीवनवाहिनी म्हणुन अत्यंत महत्त्वाचा आहे. सदर रस्त्याने कांदा आणि ऊसासारखी वजनदार वाहतुक नेहमी होत असल्याने या रस्त्याला मोठंमोठाले खड्डे पडले आहेत.  या खड्यांमुळे शेतकरी वर्गासह विद्यार्थी प्रवाशी वर्गाचेही खुप हाल होत असल्याने या रस्त्याचे मजबुत डांबरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.तरी सदरील रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 अंतर्गत संशोधन व विकास (ठऊ) 2022-23 मधुन मंजुर होणेबाबत संबधित यंत्रणेस कळवण्याची विनंती प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनाकअरूयात आला.प्रहार जनशक्ती पार्टीचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष  संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार पक्षाचे पढेगाव शाखा प्रमुख बद्रीनाथ शिंदे, कोपरगाव कार्याध्यक्ष  विलास शिंदे, संदीप श्रीरसागर, पोपट जगताप , सागर आहेस, दत्ताभाऊ भोसले, प्रविण भुजाडे आदी प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS