Homeताज्या बातम्याक्रीडा

बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये भारताचा डंका 

बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने सोमवारी जागतिक क्रमवारीत त

रोहित शर्माला भासतेय बुमराहची कमी ? 
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे निधन
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा संघ आंतर विभागीय खो-खो स्पर्धेस पात्र

बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत भारताचा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने सोमवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन रॅपिड गेम अनिर्णित राहिल्यानंतर, टायब्रेकच्या तिसऱ्या गेममध्ये प्रज्ञानानंदने चतुराईने अमेरिकन स्टार फॅबियानो कारुआनाचा 3.5-2.5 असा पराभव केला. दरम्यान, या विजयासह 18 वर्षीय प्रज्ञानानंदने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीतला अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन असेल. FIDE विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा विश्वनाथन आनंद नंतर प्रज्ञानानंद हा पहिला भारतीय ठरला होता. आता तो फायनलमध्येही पोहोचला आहे. या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या चार भारतीयांपैकी प्रज्ञानानंद हा एकमेव भारतीय आहे. दुसरीकडे, भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने आर प्रज्ञानानंद अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, ”प्राग अंतिम फेरीत पोहोचला आहे! त्याने टायब्रेकमध्ये फॅबियानो कारुआनाला पराभूत केले आणि आता त्याचा सामना मॅग्नस कार्लसनशी होणार आहे, ही खूप चांगली कामगिरी आहे.’

COMMENTS