जामखेड/प्रतिनिधी ः जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन सालाबादाप्रमाण

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन सालाबादाप्रमाणे यंदाही करण्यात आले होते.जामखेडला नागपंचमीच्या निमित्ताने मोठी यात्रा असते.गेल्या 20 वर्षापासून यानिमित्ताने श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. दि.21ऑगस्ट रोजी पािेलस निरीक्षक महेश विष्णू पाटील व आशा महेश पाटील यांच्या हस्ते सकाळी 9 वा. श्रीनागेश्वराची विधिवत पूजा व आरती करून श्रीनागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला.
यावेळी भस्म उटी रुंड मळा ! हा महादेवाचा अभंग घेऊन पालखी उचलण्यात आली. यावेळी हरहर महादेवाच्या व ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात व पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगांच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. खर्डा रोड, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्ली लक्ष्मी चौक मार्गे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून वैतरणा नदी तीरातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा श्रीनागेश्वर मंदिर येथे पोहोचला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व भावीक व नागरिक, महिला,पताकाधारी तरूण मुले यांच्या सहभागामुळे दिंडीला शोभा आली.दिंडी मार्गावर महिलांनी सडा रांगोळी केली होती. शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. एकूणच संपूर्ण जामखेड शहर आज भक्तीमय झाले होते. या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, विनायक राऊत, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.
COMMENTS