Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी सत्यशोधक, लोकहितवादी झाले पाहिजे ः प्रा.डॉ.सुभाष वाघमारे

सातारा/प्रतिनिधी : इतिहास म्हणजे केवळ गतकाळ असत नाही, इतिहासाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी विधायक प्रेरणा घ्यायच्या असतात. इतिहास वाचून चांगले क

भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात, 9 जवान शहीद 1 जखमी
कराड पालिकेकडून वसुली विभागाचा कारवाईचा धडाका
देऊळगाव राजा तालुक्यात गुड मॉर्निग पथकाचे तीन तेरा !

सातारा/प्रतिनिधी : इतिहास म्हणजे केवळ गतकाळ असत नाही, इतिहासाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी विधायक प्रेरणा घ्यायच्या असतात. इतिहास वाचून चांगले काय घडवायला हवे हा विचार सुचला पाहिजे. सत्य कधी कधी कटू असले तरी ते पचविण्याची ताकद असली पाहिजे. समाजहितासाठी  सत्याचा उपयोग विवेकी पद्धतीने केला पाहिजे. विद्यार्थ्याने सत्यशोधक तर व्हायला हवेच पण लोकहितवादी झाले पाहिजे ,असे  विचार छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या इतिहास विभागाने बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाने  सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख उपस्थित होते.
        इतिहासाचा मूल्यविचार सांगून पुढे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक गोष्टी सांगताना ते म्हणाले की आपल्यातील सुप्त असलेले फुलपाखरू उडत राहिले पाहिजे. ते आशावादी राहिले पाहिजे. नवनवीन कल्पना घेऊन समाजाला  सुख व शांती दिली पाहिजे. कष्ट करून निर्व्यसनी जीवन जगले पाहिजे. आशावादी राहिले पाहिजे. आपल्यातील विधायंक छंद व कला याचे संवर्धन करून आनंद मिळविला पाहिजे. संविधानाच्या स्वप्नातला भारत उभा राहिला पाहिजे. मणिपूर घटनेने खूप दुःखी केले आहे. या देशात जात,धर्म ,पंथ याच्या पलीकडे जाऊन  बंधुभाव जोपासण्याची तयारी केली पाहिजे. देशात  आपसात हिंसक वातावरण नको अहिंसा ,समता व न्यायाची तीव्र गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांना त्यांनी आनंदगाणी म्हणून दाखवली.  अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ.रामराजे देशमुख  म्हणाले की विद्यार्थ्यांनी जागरूक राहिले पाहिजे व  स्वतःचा  व देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे.  ऋतूचक्र संदर्भातील कविता त्यांनी सादर केली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. ए.भाग एकचा विद्यार्थी प्रतिनिधी विनय कर्चे याने केले. तर पाहुण्यांचा परिचय बी. ए.भाग तीनचा विद्यार्थी प्रतिनिधी राहुल चव्हाण याने करून दिला. यानंतर इतिहास विभागाच्या शुभांगी काळे, अंकिता पाटील, विनय कर्चे, श्रेयश सोनवणे, नेहा कदम, आकांक्षा निकम, धनश्री खडके, युवराज गोरे, ओंकार घोलप,विनय पवार, युवराज जाधव, पल्लवी गायकवाड या विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त केली.प्रथम वर्षाच्या मुलांचे यावेळी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार कृणाल जाधव याने मानले.तर सूत्रसंचालन साक्षी खंडझोडे व राज राऊत यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ डी. बी. मासाळ,डॉ. आर. व्ही. कुंभार, प्रा. मनोहर निकम, डॉ. विकास येलमार, डॉ. डी. डी. कोरडे, प्रा. एम. डी. चिंदे, प्रा. के. एस. वाघमारे,प्रा. शरद ठोकळे, डॉ. सीमा कदम, प्रा. माधवी गोडसे यांनी व इतिहास विभागातील विद्यार्थ्यानी बहुमोल सहकार्य केले.

COMMENTS