मुखेड प्रतिनिधी - गंभीर,अतिगंभीर रुग्णांना तातडीने सेवा मिळावी म्हणून शासनाने 108 क्रमांकाचे वाहन उपलब्ध करून दिले मात्र या गाडीवरील स्थानिक निय
मुखेड प्रतिनिधी – गंभीर,अतिगंभीर रुग्णांना तातडीने सेवा मिळावी म्हणून शासनाने 108 क्रमांकाचे वाहन उपलब्ध करून दिले मात्र या गाडीवरील स्थानिक नियोजन बरोबर नसल्याने रुग्णांना दोन ते तीन तास गाडीची वाट पहावी लागते. तेव्हा संबंधित प्रशासनाने लक्ष घालून वेळेवर गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाने रुग्णांना आपत्कालीन सेवा मिळावी, म्हणून राज्यात 108 हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी 108 या क्रमांकावर फोन केल्यास त्यांना तत्काळ आवश्यकतेप्रमाणे डॉक्टरांसह सुसज्ज अशी रुग्णवाहिका पाठवून मदत केली जाते.पण मुखेड तालुक्यात 108 रुग्नवाहिकेची सेवा कोलमडली असून अतिगंभिर रुग्नांना दोन ते तीन तास वाट पहावी लागत असल्यामुळे रुग्नांची हेळसांड होत आहे. एखादा अपघात झाला, कोणाला भाजले, कोणाला हृयविकाराचा झटका आला अथवा बाळंतपणासाठी एखाद्या गंभीर रुग्नास तातडीने उपचारासाठी जायचे झाले तर 108 रुग्णवाहिकेची आठवण होते. या रुग्णवाहिकेद्वारे 24 तास सेवा दिली जाते. मुखेड तालुका हा क्षेत्रफळाने मोठा तालुका आहे. तालुक्यात तीन राष्ट्रीय महामार्ग व एक राज्यमहामार्ग जात असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी नागरिकांना 108 ची सेवा खूपच जीवनदायी ठरत असते. 108 रुग्नवाहिका उपजिल्हा रुग्णालय मुखेड 1 व प्राथमिक आरोग्य केंद्र बा-हाळी येथे 1 अशा तालुक्यात 2 तर बाजूच्या मांजरम, बारुळ,कुरुळा,नायगाव, जळकोट येथून 108 सेवा पुरवली जाते पण कधी कॉल केला की वेटिंग कॉल असतो. मुखेडची रुग्नवाहिका सायंकाळी 6 वाजता नांदेड गेली तर ती सकाळीच परत येते वर कळवतात गाडीत बिघाड झाला. तेव्हा आजुबाजुच्या दवाखाण्याच्या गाड्यांचे लोकेशन तपासले जाते.मग त्याही चालक व डॉक्टरांची बनवाबनवीचा कॉल केला जातो. मग अशा प्रकाराने रुग्नास तातडीची मदत मिळत नाही.त्यामुळे पदरमोड करुन खाजगी वाहनाने नांदेड गाठावे लागते.दरम्यान दि.15 ऑगस्ट रोजी शिरुर (द.) येथील 45 वर्षीय महिला चंद्रकला गोपाळ टाळिकोटे या रात्री 9 वाजता कंबरेच्या मनक्यास जबर दुखापत झाल्यामुळे मुखेडच्या उपजिल्हा रुग्नालयात दाखल झाल्या.वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी उपचार केला.पण रुग्नास तीव्र वेदना होत होत्या. वेदना थांबेनात शेवटी त्या रुग्नास एम.आर.आय.काढणे आवश्यक असल्यामुळे नांदेड जाण्याचा सल्ला देऊन संदर्भित केले. पण नातेवाईक रात्री 9 पासून 108 च्या रुग्नसेवेस कॉल केला तर अनेक अडचनी सांगत रात्रीचे 12 वा. बा-हाळी येथून रुग्नवाहिका आली.अशा गंभीर रुग्नास 3 तास विव्हळत पडावे लागले.तेव्हा 108 गाडीची सेवा देणार्या गाडीवर लक्ष ठेवून कामा कुचराई करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
COMMENTS