Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाचे शिक्षण घ्यावे ;पाटील 

सातपूर :- विद्यार्थ्यांनो काळानुरुप कौशल्य शिक्षण आत्मसात करा.शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाचे शिक्षण घ्या.जे काही कराल ते अगदी मनापासून करा.छंद जोपा

गिगाबाईट कॉम्प्युटर केडगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 
टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन
एकलव्य संघटनेच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे ब्राम्हणगावात उद्घाटन

सातपूर :- विद्यार्थ्यांनो काळानुरुप कौशल्य शिक्षण आत्मसात करा.शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाचे शिक्षण घ्या.जे काही कराल ते अगदी मनापासून करा.छंद जोपासा असे प्रतिपादन राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. सातपूर कॉलनीतील एमआयजी 52 समता नगर सोसायटीच्यावतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.पाटील यांनी पुढे सांगितले की,पालकांनी देखील नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे पाल्य घडवावेत. यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण आत्मसात करावे. पालकांनीही सजग राहिले पाहिजे.तर माजी नगरसेवक सलीम शेख यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बागुल होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.प्रास्तविक उपाध्यक्ष शंकर पाटील यांनी केले.सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गोकुळ सोनवणे यांनी केले.स्वागत नितीन विसपुते,शरीफ शेख यांनी केले.प्रकल्प संयोजक भगवान सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी सुधाकर मारु,फारुखखान पठाण,देवराम ठोंबरे,राजेंद्र पाटील,रंजीता महाडिक,भरत त्रिवेदी,सुभाष काळे,किरण विसपुते,रमेश हिंगे,विजय स्वामी,विजय चिटणीस,संदीप कुलकर्णी,जमिल शेख,अनुप पाटील,उषा ठाकूर, शैला विसपुते,रत्ना सोनवणे,शुभांगी विसपुते, मालती सोनवणे,रोहिणी सोनवणे,रजनी हिंगे, शशिकला पाटील आदिंसह सभासद उपस्थित होते.प्रारंभी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

COMMENTS