Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘गाथा परिवार’आणि ‘अभंग एकविशी- तुकोबारायांची’ पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

नाशिक प्रतिनिधी - जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या निवडक २१ अभंगांचे संकलन करून 'गाथा परिवार' आणि आमदार अमोल मिटकरी यांनी तयार केलेल्या 'अभंग

शहराच्या वैभवात भर पडेल असे काम करा ः उपमुख्यमंत्री पवार
‘पुणे-नाशिक रेल्वेमार्ग’ हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा -उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक प्रतिनिधी – जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या निवडक २१ अभंगांचे संकलन करून ‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांनी तयार केलेल्या ‘अभंग एकविशी- तुकोबारायांची’ पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आज झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आ.अमोल मिटकरी, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. नितीन पवार, आ. किरण लहामटे, गाथा परिवाराचे अविनाश महाराज काकडे, अशोक महाराज काळे, तुलसीदास खिरोडकर, राजु चिमणकर, नंदकिशोर चिपडे, अनंत गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS