Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केएसके कॉलेजच्या शिक्षकाला तात्काळ बरखास्त करा-नुमान चाऊस

माजलगाव प्रतिनिधी - बीड येथील केएसके कॉलेजमधील बाकड्यांवर एका विशेष समाजाच्या भावना दुखावणारे शब्द लिहिण्यात आले होते, त्या प्रकरणी तेथील बॉटनीच

औषध खरेदीच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक 
वाळू डेपो विरोधात. आ.गडाख ग्रामस्थांसह मैदानात
निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार : डॉ. श्रीपाल सबनीस

माजलगाव प्रतिनिधी – बीड येथील केएसके कॉलेजमधील बाकड्यांवर एका विशेष समाजाच्या भावना दुखावणारे शब्द लिहिण्यात आले होते, त्या प्रकरणी तेथील बॉटनीच्या शिक्षकावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. जवळपास एक आठवडा उलटून गेला तरी कॉलेज प्रशासनाने आतापर्यंत त्या शिक्षकावर कोणतीही कारवाई केलेली नाही व सर्विस बुक मध्ये सुद्धा नोंद केलेली नाही. त्या शिक्षकाला तात्काळ कायमस्वरूपी बरखास्त करण्याची मागणी समाज बांधवांकडून व समाजातल्या शांतता प्रिय लोकांकडून होत आहे. याचाच एक भाग म्हणून मा. उपविभागीय अधिकारी (माजलगाव) यांना भेटून सविस्तर चर्चा करून त्यांच्या स्तरावर केसके कॉलेज प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश देण्याचे निवेदन मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा जमियते उलेमा ए हिंद चे माजलगाव तालुका उपाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी दिले.

COMMENTS