Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या शाळांचा थकीत बिलामुळे विजपुरवठा खंडीत

संगणकासह इ-लर्निंग सुविधा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान

बीड प्रतिनिधी - देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होताना दिसत आहे. बीड जिल्

हिंजवडी मध्ये आढळला बेवारस मृतदेह.
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
उद्या दहावीचा निकाल

बीड प्रतिनिधी – देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये मागील दोन वर्षांपासून महावितरणचे विजबील न भरल्याने शाळेचा विजपुरवठा खंडीत केला असुन त्यामुळे शाळांमधील संगणक,ई-लर्निंग सुविधेसह वीज उपकरणे बंद असल्याने विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असुन संबंधित प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विजबील भरून वीजपुरवठा सुरळीत करुन शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, शिक्षणाधिकारी प्राथमिक, यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, शालेय शिक्षणमंत्री, सचिव शिक्षण मंत्रालय विभाग, शिक्षण आयुक्त पुणे यांना केली आहे.पाटोदा तालुक्यातील 112 जिल्हा परिषद शाळांमधील खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चितळे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनावर पत्रकार हमीद खान पठाण, शेख जावेद, रियाज महंमद, रामदास भाकरे, पोलिस संघटना तालुकाध्यक्ष सतिश गर्जे, शिवसेना (उबाठा ) तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे, युवासेना शहरप्रमूख अजिंक्य डोरले आदिंच्या स्वाक्षर्‍या आहे

पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण 184 शाळा असुन ज्या शाळांनी मागील 2 वर्षांपासून वीज बील थकीत असल्याने 112 शाळांचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे त्यामुळे शाळेतील संगणक, इ-लर्निंग सुविधा, डिजिटल सेवेसह वीज उपकरणे बंद पडली आहेत.परीणामी विद्यार्थ्यांचे डिजिटल शिक्षण धोक्यात आले आहे.शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांनी तातडीने विज बिल भरून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी पाटोदा, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पाटोदा यांना केली आहे. तहसीलदार चितळे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी संबंधित विषय गटशिक्षणाधिकारी यांचा असुन त्यांना भेटण्याचे सांगितले परंतु साडे अकरा वाजुन झाले तरी गटशिक्षणाधिकारी पिकवणे ऑफिस कारला असल्यामुळे एकाने खुर्चीला हार घालून व निवेदन देण्यात आले.एकंदरितच गटशिक्षणाधिकारी यांना सुद्धा गोरगरीबांच्या शिक्षणाविषयी गांभीर्य नसल्याचे दिसून आले. पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 112 शाळांमधील विजपुरवठा खंडीत केल्याने विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असुन संबंधित प्रकरणांमध्ये लक्ष घालून तोडगा काढावा अशी विनंती लोकप्रतिनिधी खा.प्रितमताई मुंढे,आ.बाळासाहेब आजबे आणि आ.सुरेश आण्णा धस यांना केली आहे. पाटोदा तालुक्यातील वीज पुरवठा तोडण्यात न आलेल्या 72 शाळा पैकी 62 शाळेत सध्या लोकसहभाग आणि 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातुन सोलार ऊर्जा प्लांट बसविण्यात आले असून प्रामुख्याने अंमळनेर शाळा जरेवाडी,नफरवाडी,आदि.गावात वीजेची सोय झाली आहे. तर 10 गावातील जिल्हा परिषद शाळेत अजुनही वीज पोहोचलीच नाही.

COMMENTS