Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी - भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घातल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभी

जुन्नरजवळील अपघातात दोन महिलांचा मृत्यू
मिरजेतील अपघातात 5 जणांचा मृत्यू
अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’ .

सातारा प्रतिनिधी – भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घातल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले होते. मात्र गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सातारा जिल्ह्यातील सूर्याचीवाडी गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे. मायणी-दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान मारुती ओमनी गाडीचा अपघात होऊन तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. ओमनी गाडी झाडावर आदळल्याने तीन जण जागीच ठार झाले. तर अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यातील एकाच रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडीतील सर्व प्रवासी कुरोली व बनपुरी येथील रहिवासी होते. बाळू मामाच्या मेंढराचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला आहे. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील प्रवासी सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. कातरखटाव ते मायणी दरम्यान असलेल्या सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र जखमींपैकी आणखी एकाचा मृत्यू होऊन मृतांची संख्या चार पोहोचली आहे. पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

COMMENTS