Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मीरा भाईंदरचे आयुक्त ईडीच्या रडारवर

मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलीप ढोले यांना समन्स

मुंबई/प्रतिनिधी : मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले सध्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या रडारवर असून, त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ई

काझी गढीच्या संरक्षण भिंतीचे काम आठ दिवसात सुरु करावे अन्यथा जन आंदोलन करू
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट
मुंबईकरांच्या मालमत्ता करात होणार वाढ?

मुंबई/प्रतिनिधी : मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले सध्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या रडारवर असून, त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बुधवारी समन्स बजावले आहे. कोट्यवधी रुपयांच्या नागरी जमीन कमाल मर्यादा नियमन कायदा घोटाळ्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांशी कथित घोटाळ्याशी संबंधी मनी लाँड्रिंगच्या तपासाचा एक भाग म्हणून ईडीने दिलीप ढोले यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.
ठाणे पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये यूएलसी घोटाळा शोधून काढल्यानंतर याचा तपास सुरु केला होता.  ज्यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नागरी जमीन कमाल मर्यादा कायदा कायद्याचे उल्लंघन करुन, लाच देऊन आणि बनावट कागदपत्रांचा वापर करुन अतिरिक्त जमीन सरकारला देण्याचे टाळले होते. दिलीप ढोले यांना अर्बन लँड सीलिंग रेग्युलेशन (यूएलसीआर) कायदा प्रकरणातील एजन्सीच्या चौकशीशी संबंधित माहिती आणि स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. ढोले यांनी मार्च 2021 मध्ये मिरा भाईंदर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी एक वर्षापूर्वी, ते अतिरिक्त आयुक्त म्हणून ठाणे महानगरापालिकेत रुजू झाले होते. नोव्हेंबर 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन कमाल मर्यादा विभागात घोटाळा उघडकीस आणून मीरा-भाईंदर येथील एका बिल्डरला अटक केली होती.

COMMENTS