मुंबई : डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्याची नावे आहेत. या दोघा
मुंबई : डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्याची नावे आहेत. या दोघांविरोधात ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील एकूण 18 गुन्ह्यांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका डान्स बारमधील एका बारबालेवर यूसूफचा जीव जडला होता. आत्तापर्यंत त्याने तिच्यावर 50 लाख रुपयांची उधळण केली. केवळ तिच्यावर पैसे उधळण्यासाठी यूसूफ त्याचा मित्र नौशादसोबत चोर्या करत होता. हे दोघे सराईत गुन्हेगार असून युसूफला याआधी 23 गुन्ह्यात तर नौशादला 11 गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या दोघांची जेलमध्ये मैत्री झाली होती. पोलिसांनी या दोघांकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सव्वा दोन लाखांची रोकड, दोन बाईक, 2 लॅपटॉप, 8 मोबाईल, पाच महागडी घड्याळ, 1 महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड हस्तगत केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडीचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी, लूट, स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक मदने, पोलिस अधिकारी सनिल तारमळे, अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे या तीन पोलिस अधिकार्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु केला. अखेर पोलिसांना यश आले. पोलिसांनी नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणारा यूसूफ शेख आणि त्याचा मित्र नौशादला अटक केली. या दोघांकडून 18 गुन्ह्याची उकल झाली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दागिने, पैसे, लॅपटॉप मोबाईल इतर साहित्य जप्त केले आहे. यूसूफ याला 23 चोरी प्रकरणात या आधी अटक करण्यात आली होती. नौशादलाही 11 चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.
COMMENTS