Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडली काडतुसे

एटीएस करणार कार मालकाची चौकशी

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने पुण्यातून दोन आणि रत्नागिरीतून काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौक

चंदीगड विमानतळाबाहेर खलिस्तानी घोषणा
नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित ?
चोर पोलिसांवर भारी… नगरच्या SP ऑफिस मधूनच चोरली पोलिसाचीच गाडी….l Lok News24

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने पुण्यातून दोन आणि रत्नागिरीतून काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येतांना दिसून येत आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांनी पुण्यात आल्यावर एक कार विकत घेतली असून या गाडीत जीवंत काडतूसे मिळाली आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून कार मालकाची देखील चौकशी केली जात आहे.
कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय 24) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय 23, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता दोन पिस्टल सापडल्या होत्या. तसेच कारमध्ये देखील पिस्टल आणि 5 जिवंत सापडली होती. दरम्यान, त्यांनी ज्याच्यांकडून कार घेतली आहे, त्याची चौकशी सुरू केले आहे. हे दोघेही अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून दोघेही एनआयएच्या रडारवर होते त्यांचावर तब्बल 5 लाख रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आले होते. या दोघांना अटक केल्यावर त्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32 रा, कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय 27) याला देखील अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पुण्यात बॉम्ब बनवण्याचे शिबीर आयोजित केले होते. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्विपमेंट्स त्यामध्ये थर्मामीटर, पिपेट आदि साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीचे तांत्रिक विश्‍लेषण केल्यावर हे चारही जण एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्या जवळ असलेल्या सीमकार्ड वरुन याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यांचे शैक्षणिक कागद पत्रे मिळाली आहे. त्यांच्याकडे मिळालेली स्फोटके रासायनिक पावडर तसेच इतर साहित्य बघता हे सर्व बॉम्ब तयार निपुण होते. त्यांनी घरीच याची तयारी केली होती, असे तपासात उघडकीस आले आहे. जगभरात गुन्हे करण्यासाठी ज्या काही पद्धती वापरल्या गेल्या आहेत, या सर्वांचा अभ्यास करून ते भारतात दहशतवादी कारवाया करणार होते, असे देखील तपासात निष्पन्न झाले आहे.

COMMENTS