विंचूर : विंचूर शहर व परिसरात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून या आजाराचा
विंचूर : विंचूर शहर व परिसरात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून या आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असून खासगी व शासकीय दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पावसाळी वातावणामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावत असतानाच आता डोळे येण्याची साथही पसरत चालली आहे. याचा परिणाम मात्र येथील व्यवहारांवर होत आहे. सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
◆एरवी उन्हाळ्यात डोळे येण्याचे प्रकार आपण बघितले आहेत. मात्र, यावर्षी पावसाळ्यात वातावरणात कंजक्टिवाईटीस नावाचा व्हायरस पसरल्यामुळे डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे.
◆या आजाराचे लहान मुलांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी किंवा रुग्णांनी घरात बसून औषधोपचार घेण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे.
◆हा आजार योग्य औषधोपचाराने तीन ते चार दिवसांत बरा होत असल्याने चिंता करण्याचे काही कारण नाही. मात्र, संसर्ग होऊ नये यासाठी ज्या रुग्णांना आजार झालाय त्यांनी व नाही झालेला त्यांनीही पसरवतात. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांनी केले आहे. तसेच येत्या पंधरवड्यात ही साथ आवाक्यात येईल.
अशी घ्या डोळ्यांची काळजी
• डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवा.
• इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे आदीने डोळे पुसू नये.
• डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.
• उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्याचा वापर करावा.
• आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.
• कचऱ्यावरील माशा ज्या डोळ्याची साथ पसरवतात.
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.
• गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
COMMENTS