त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी - अधिक मास सुरू होऊन तेरा दिवस सुटले आहेत. पहिल्या दिवसापासून धोंडा न्हायला भाविकांची अलोट गर्दी, कुशावर्त तीर्थावर
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – अधिक मास सुरू होऊन तेरा दिवस सुटले आहेत. पहिल्या दिवसापासून धोंडा न्हायला भाविकांची अलोट गर्दी, कुशावर्त तीर्थावर पाय ठेवायला जागा नाही.अशी काहीची स्थिती असते आहे. अधिक मासात गंगा स्नान करणे दीपदान करणे अशी पूर्वापार प्रथा आहे येणाऱ्या गर्दीत ६५ टक्के महिला तर ३५ टक्के पुरुष भावीक दिसत असून महिला भाविकांचा अधिक पुजे कडे जास्त कल दिसून आला आहे. एसटी बसच्या प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत महिलांना मिळत असल्याने महिला भाविकांची संख्या जास्त वाढल्याचे दिसते.
2020 मध्ये अधिक मास आला असता कोरोना काळ होता त्यामुळे भाविकांना अधिकमासाचा पूर्व काळ साधता आला नव्हता. या कारणाने ही मोठी गर्दी वाढलेली आहे. गोदावरीच्या तीर्थात स्नान करून गंगेला वाण देण्यासाठी दीपदान करण्यासाठी भाविक उत्सुक असतात पाच बत्ताशे पाकीट तांब्याचे दिवलाने फुले वाहून गोदावरीला वाण दिले जाते. भर पावसातही गर्दी कमी नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नियोजनाचा अभाव असल्याने बस स्थानकासह सर्वत्र ढासाळलेल्या नियोजनाचा फटका भाविकांना बसत होता बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य आहे.त्र्यंबकेश्वर मंदिरात संत निवृत्तीनाथ मंदिरात मोठ्या रांगा भाविकांच्या दिसतात.त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाज्याकडे जाणाऱ्या रस्त्यांकडे मोठी अस्वच्छता आहे. बत्तासे 160 ते 200 रुपये किलो असून रविवार सोमवार या दिवशी बत्ताशांचा तुटवडा बाजारपेठेत जाणवला. त्रंबकेश्वर मंदिरा कडे पोलिसांचा बंदोबस्त असतो पण परंतु तिर्था कडे पोलीस बंदोबस्त नसतो पूर्ण महिनाभर पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी आहे. बाजारात अधिक मासाच्या पोथ्या उपलब्ध आहेत. या काळात अनेक लोक उपास करतात परंतु उपासाच्या फळांची मागणी वाढलेली असून फळे व उपासाचे पदार्थ यांचे भाव तेजीत आहे.अधिक मास १६ ऑगस्टला संपेल. याचा अर्थ अजून पंधरा दिवस अधिक मास पर्वकाळ साधता येईल. धोंडा न्हाता येतो.
COMMENTS