Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा उत्पादकांना 550 कोटींची नुकसान भरपाई

मंत्री सत्तार ः 15 ऑगस्टपूर्वीच खात्यावर जमा होणार रक्कम

मुंबई/प्रतिनिधी ः अतिवृष्टी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 550 कोटी रुपयांची नुकसान भरपा

टीईटी घोटाळाप्रकरणी माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा पाय खोलात
स्वपक्षातील नेत्यांचेच माझ्याविरोधात षडयंत्र
कृषीमंत्री सत्तारांचा पाय आणखी खोलात

मुंबई/प्रतिनिधी ः अतिवृष्टी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना 550 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली. तसेच ही रक्कम शेतकर्‍याच्या खात्यात 15 ऑगस्टपूर्वीच जमा होईल, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
राज्यात अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. मात्र या शेतकर्‍यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आज विधान परिषदेत आमदार अमोल मिटकरी, सतेज पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर 550 कोटींची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन अब्दुल सत्तार यांनी दिले. मात्र, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई केव्हा देणार, याची तारीख सांगा असा आग्रह आमदारांनी धरला. त्यानंतर सभापती नीलम गोर्‍हे यांनी देखील मदतीची तारीख जाहीर करा, अशी सूचना अब्दुल सत्तार यांना केली. त्यावर अब्दुल सत्तार यांनी 15 ऑगस्ट पूर्वी खात्यात पैसे दिले जाणार, असे आश्‍वासन अब्दुल सत्तार यांनी दिले. राज्यात अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात बसला. या शेतकर्‍यांना सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. निधी कधी देणार ते सांगा? असे म्हणत आमदार विधान परिषदेत आक्रमक झाले होते. विरोधकांच्या प्रश्‍नावर मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, सध्या 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल. यामध्ये 550 कोटींची नुकसान भरपाई दिली जाईल. मात्र यामध्ये अंतिम अहवाल आल्यानंतर वाढीव निधीसह मदत केली जाईल.

पाचशे कोटींची मदत अपुरीच ः अंबादास दानवे – अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीनंतर अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने 3 लाख 2 हजार 444 शेतकर्‍यांना जाहीर केलेली 500 कोटी रुपयांची मदतीची तरतूद ही अपुरी आहे. तसेच, मोठया प्रमाणात कांदा व बी बियाणे सडल्याने नवीन कांदा उत्पादन करण्यासाठी बी बियाणांचा तुटवडा निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. त्यावर सत्तार यांनी बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल, असे सागितले.

COMMENTS