Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नीलम गोर्‍हे यांच्या अडचणी वाढणार ?

उपसभापती पदावर विरोधकांचा आक्षेप विरोधकांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई/प्रतिनिधी ः विधान परिषदेतील उपसभापतीपद विरोधी पक्षाला दिले जाते, त्यामुळे ठाकरे गटाच्या नीलम गोर्‍हे यांना हे पद देण्यात आले होते, मात्र का

पुण्यातून 134 किलो गांजा मुंबई, नागपूर आणि वारणसीतून 31 किलो सोने जप्त
भाजीपाला महागला; टोमॅटोचे दर शंभरी पार
कृषी जैवतंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी उत्तम करीअर संधी ः डॉ.अमोल सावंत

मुंबई/प्रतिनिधी ः विधान परिषदेतील उपसभापतीपद विरोधी पक्षाला दिले जाते, त्यामुळे ठाकरे गटाच्या नीलम गोर्‍हे यांना हे पद देण्यात आले होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यामुळे विधिमंडळात त्यांच्या पदावर आक्षेप घेण्यात आला असून, महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे, त्यामुळे विरोधकांनी थेट राज्यपालांची भेट घेतली.
यावर बोलतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, पाशवी बहुमताच्या बळावर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका दानवे यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली असून आम्ही त्यांच्या निर्णयाची पतिक्षा करत असल्याचे दानवे यांनी सांगितले.विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांना तत्काळ दूर करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली असल्याचे अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या आधी देखील गोर्‍हे यांच्यावर भाजपने अविश्‍वास प्रस्ताव दिलेला आहे. आता आम्हीही तसा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर काम करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे अंबादास दानवे म्हणाले.
अंबादास दानवे म्हणाले की, नीलम गोर्‍हे यांनी पक्षांतर केले आहे. मात्र त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानपरिषदेवर पाठवलेल्या प्रतिनिधी आहेत. म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने नीलम गोर्‍हे यांच्याबाबत अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. नैतिकदृष्ट्या नीलम गोर्‍हे यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीच्या खुर्चीवर बसता येणार नाही. या विरोधात आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण उपसभापती आणि सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असे अंबादास दानवे यांनी म्हटलेे आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी घोट्याळ्यांवर चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. स्वतःच्या मित्रांना क्लीनचीट देण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे का? ही चौकशी लोकायुक्तांकडून व्हायला हवी. आजपर्यंत मी जी कागदपत्रे मागितली ती मुंबई महापालिकेने दिलेली नाहीत. गद्दारांच्या चेहर्‍यांकडे बघून त्यांच्या मनात काय हे दिसत होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मविआकडून अपात्रतेची नोटीस – नीलम गोर्‍हेंविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे त्या सभागृहाचे कामकाज करू शकत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आमच्या नीलम गोर्‍हेंवर विश्‍वास नाही, त्यांना नैतिक दृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांनी विधान परषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनिषा कायंदे, नीलम गोर्‍हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे

COMMENTS