Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिल्लीया गर्ल्स शाळेत शिक्षण संचालकांची भेट

बीड प्रतिनिधी - बीड येथील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था मिल्लीया गर्ल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथे गुरुवारी शिक्षण सहाय्यक संचालक अनिता कडू

भाजपचा देवेंद्र फडणवीस यांना धक्का
एमएसपीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक
जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप

बीड प्रतिनिधी – बीड येथील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था मिल्लीया गर्ल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथे गुरुवारी शिक्षण सहाय्यक संचालक अनिता कडू मॅडम यांनी शाळेची प्रगती व विशिष्ट उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भेट दिली. त्यांनी शाळेतील स्वच्छता, शैक्षणिक प्रगती, डिजिटल शिक्षण, वैज्ञानिक उपक्रम, व कम्प्युटर लॅब  यांची सखोल निरीक्षण केले व शाळेतील प्रगती विषयी खूप समाधानी असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या बरोबर विक्रम सारुख (शिक्षणाधिकारी नियोजन )काझी माजेद (उपशिक्षण अधिकारी नियोजन ) संस्थेचे सचिव साहेबा खान सबीहा शाळेचे मुख्याध्यापक सिद्दिकी इरफान  उप मुख्याध्यापक खुर्शीद अहमद सुपरवायझर नसरीन फराना जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण सहाय्यक संचालक मॅडमने विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती पाहून खूप भरून गेले व असेच काम करण्याचे सांगितले व शाळेतील  कर्मचार्‍यांचे ही अभिनंदन केले.

COMMENTS