Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायकवाडी धरणात केवळ 26 टक्केच जलसाठा शिल्लक

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यातही जायकवाडीच्या उर्ध्व भागात जोरदार पाऊस न पडल्यामुळे जायकवा

यंदा जायकवाडी धरणामध्ये पाण्याची मोठी तूट – इंजि. चकोर
जायकवाडीला पाणी सोडल्यास उच्च न्यायालयाचा अवमान होणार 
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय कायम

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यातही जायकवाडीच्या उर्ध्व भागात जोरदार पाऊस न पडल्यामुळे जायकवाडीत पाण्याची आवक थांबलेली आहे. दुसरीकडे मात्र पाण्याचा वापर सुरूच असल्याने 9 जुलै रोजी जायकवाडी धरणात केवळ 26.86 टक्केच जलसाठा उरला आहे.
शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी सुरू केली असल्याने मराठवाड्यातील जनता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत जून महिना गेला. आता जुलैचे 9 दिवस उलटले तरी गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडलेला नाही. पावसाने दांडी मारल्याने मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत. दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आकाशात ढग दाटून येत आहेत. मात्र, मुसळधार पाऊस पडत नाही. परिणामी, मराठवाड्यातील नदी, नाले अजूनही कोरडे पडलेले आहेत. पैठण येथील जायकवाडी धरणाचा साठा दिवसेंदिवस घटत आहे. 9 जुलै रोजी जायकवाडी धरणात 26.86 टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून प्राप्त झाली. याशिवाय अन्य मोठी, मध्यम आणि लघु धरणे तळ गाठत आहेत. जायकवाडीवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील एमआयडीसी तसेच विविध शहरांची तहान भागविली जाते. जायकवाडी धरणाची आजची स्थिती धरणाची पाणी साठवण क्षमता- 2171 द.ल.घ.मी. आजचा जिवंत जलसाठा – 583.138 द.ल.घ.मी. आजच्या साठ्याची टक्केवारी- 26.86 टक्के गतवर्षी आजच्या दिवशी असलेला जलसाठा- 747 द.ल.घ.मी. गतवर्षीची टक्केवारी – 34.45 टक्के आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीक्षेत्र – 7 लाख 75 हजार हेक्टर. आजपर्यंत झालेली पेरणी- 3 लाख 16 हजार हेक्टर जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पाऊस 169 मि.मी.प्रत्यक्षात झालेला पाऊस -136 मि.मी. गतवर्षी आजच्या तारखेस झालेला पाऊस- 201 मि.मी. पावसाची नोंद आहे.

COMMENTS