Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

147 गुंतवणूकदारांची 18 कोटींची फसवणूक

मुंबई/प्रतिनिधी ः चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 147 गुंतवणूकदारांची सुमारे 17 कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर

हंडेवाडीच्या युवकाची व्हॉटस अ‍ॅपद्वारे 4 लाखाची फसवणूक
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाला एक कोटींचा गंडा

मुंबई/प्रतिनिधी ः चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 147 गुंतवणूकदारांची सुमारे 17 कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आयात-निर्यात करणार्‍या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना प्रति महिना 7 ते 10 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले होते.
आरोपीने गुंतवणूकदारांना सुरुवातीला व्याज दिले, पण नंतर पैसे बुडवले, असा आरोप आहे. 147 गुंतवणूकदारांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांची एकूण 17 कोटी 94 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. येत्या काही दिवसांत पीडित गुंतवणूकदारांची संख्या वाढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील तक्रारदार डॉ. राजीव शर्मा (45) स्त्रीरोगतज्ज्ञ असून न्टॉप हिल फर्टिलिटी अ‍ॅण्ड हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. डिसेंबर 2021 मध्ये आरोपी वेंकटरामनन गोपालने एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये गुंतवणूक योजनेबाबत जाहिरात दिली होती. ती वाचून शर्मा यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मूळचे चेन्नईतील रहिवासी असलेले गोपालन यांनी आपण जीव्हीआर आयात व निर्यात कंपनीचे मालक असल्याचे सांगितले होते. त्या कंपनीचे कार्यालय मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) येथे असून गेल्या पाच वर्षांपासून कंपनी सिंगापूर, दुबई, मलेशिया सांरख्या देशांमध्ये फळे, भाज्या, सुका मेवा, मसाल्यांची आयात – निर्यातीचा व्यवसाय करीत असल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले होते. तक्रारीनुसार, आरोपीने डॉक्टर शर्मा आणि त्यांच्या आईला त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या व्यवसायाच्या योजना समजावून सांगताना एक वर्षासाठी 10 लाख रुपये जमा केले तर त्या बदल्यात त्यांना दरमहा 70 हजार रुपये व्याज मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. गोपालनच्या सांताक्रूझ (पूर्व) कार्यालयाला भेट दिल्यानंतर आणि त्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर डॉ. शर्मा आणि त्यांच्या आईने योजनेत गुंतवणूक करण्याचे मान्य केले. पुढे त्यांचा विश्‍वास बसल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये गोपालनच्या कंपनीत 76 लाख रुपयांची गुंतवणूक केली व त्याबाबत कागदोपत्री करारही केला. तक्रारदारांना जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत व्याजाची रक्कम देण्यात आली. त्यानंतर रक्कम येणे बंद झाले. शर्मा यांच्याप्रमाणे इतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन पोलिसात तक्रार दाखल केली. वाकोला पोलिस ठाण्यात शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. गोपालनविरोधात याप्रकरणी फसवणूक व फौजदारी विश्‍वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

COMMENTS