Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हीडीओ कॉलवर क्यूआर कोडस्कॅन करून 51 हजार लुटले

नगरमधील महिलेची फसवणूक

अहमदनगर प्रतिनिधी - व्हिडीओ कॉलवरून फोन पे चा क्युआर कोड स्कॅन करून महिलेच्या बँक खात्यातील 51 हजार 989 रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. शनिवारी

घराच्या शोधातील व्यक्तीची साडेचार लाखाची फसवणूक
शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंड मध्ये फसवणूक
गुंतवणूकीचे आमिष; वृद्धेची पाच लाखांत फसवणूक

अहमदनगर प्रतिनिधी – व्हिडीओ कॉलवरून फोन पे चा क्युआर कोड स्कॅन करून महिलेच्या बँक खात्यातील 51 हजार 989 रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथील महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे प्रोफेसर कॉलनी चौकात ब्युटी पार्लरचे दुकान आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता फिर्यादी यांच्या मोबाईलवर एका मोबाईल नंबरवरून फोन आला होता. फोनवर बोलणारा समोरचा व्यक्ती फिर्यादीला म्हणाला,‘आर्मी पब्लीक स्कूल येथे 10 महिलांचा मेकअप करायचा आहे, त्यासाठी किती खर्च येईल’, असे विचारल्याने फिर्यादीने त्याला 12 हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यावर त्याने फिर्यादीला सांगितले की, मी तुम्हाला पाच हजार रुपये ऑनलाईन टाकतो व बाकीचे पैसे मेकअप झाल्यानंतर देतो. फिर्यादीचा विश्‍वास संपादन झाल्याने त्या व्यक्तीने ब्युटी पार्लरमधील दुसर्‍या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल केला. त्या व्यक्तीने फिर्यादीला त्यांचा फोन पे अ‍ॅप ओपन करून त्यावरील क्युआर कोड दाखविण्यास सांगितले. फिर्यादी यांनी तसे करताच त्याने क्युआर कोड स्कॅन करून फिर्यादीच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून 51 हजार 989 रुपये काढून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

COMMENTS