Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रखडलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात

पिंपळनेर प्रतिनिधी - सतत पडणार्‍या पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने रखडलेल्या  पेरणीच्या कामांना पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसून येत आहे. जून

राहुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
शेतकरी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शोधतात नवनवीन मार्ग……. 
‘पीएम किसान’, ‘नमो शेतकरी’साठी साडेतेरा लाख शेतकरी पात्र

पिंपळनेर प्रतिनिधी – सतत पडणार्‍या पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने रखडलेल्या  पेरणीच्या कामांना पुन्हा एकदा जोर धरल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यातील 20 दिवस पावसाने हुलकावणी दिल्याने  पेरणीची कामे होऊ शकली नव्हती. मात्र, जुलैच्या सुरुवातीस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजाने  पेरणीची कामे सुरू केली आहेत.
काही शेतकर्‍यांनी जून महिन्याच्या,शेवटच्या  आठवड्यात पेरणी केली. मात्र, पाऊस न झाल्याने पेरणी झालेली वाया जाण्याच्या भीतीने तोही चिंतातूर झाला होता. पेरण्यांना उशीर झाल्याने ,पेरणी,कोळपणी,खुरपणी आदींची कामे उशिरा होणार असल्याने व एकाच वेळी ही कामे सुरू होणार असल्याने मजुरांचा तुटवडा जाणू शकतो, या विवंचनेत शेतकरी राजा सापडला आहे. गेले दोन दिवस पावसाने,जोरदार हजरी लावल्याने  रखडलेल्या पेरणीच्या कामाने जोर धरला आहे. मात्र, या रखडलेल्या पेरणीची कामे वेगाने सुरू झाली असली तरी शेतातील कामे, पेरणी बैलाची मोगडनी  , ट्रॅक्टर मिळत नसल्याने ट्रॅक्टर मालकांच्या मागे मागे फिरण्याची वेळ आली आहे. पेरणीच्या कामाला मजूरही मिळत नसल्याने पहाटे उठून मजुराच्या घरी जाऊन त्याला आपल्या खर्चाने आणावे व सोडावी लागत आहे. केलेल्या पेरणीवर खत मारून आवण लवकर तयार होण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने व कडक ऊन पडल्याने खोळंबून राहिलेल्या कामांनी जोर धरला आहे.पाऊस भरपूर , पडत असल्यामुळे सर्वच पेरण्या होतील असा अंदाज आहे.कापूस, बाजरी सोयाबीनला अधिक पसंती आहे मुग, मटकी पेरणीची वेळ निघून गेली आहे.पेरण्या उशीर झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता,  मेहेत्रे बळी , या शेतकर्‍यांनी केली आहे.

COMMENTS