माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल

सारे शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी शुक्रवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी दाखल झाले आहेत.

श्री स्वामीचे अनुभव | श्री स्वामी समर्थ | Shri Swami Anubhav
पुन्हा एकदा शिक्षकांचा आमदार  हा शिक्षकच झाला आहे – रवींद्र चव्हाण
राज ठाकरेंचे ट्वीट; शिंदेना अभिनंदन आणि सावधानतेचा इशारा.

नागपूर : सारे शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी शुक्रवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी दाखल झाले आहेत. यापूर्वीही महिनाभरापूर्वी ईडीच्या 3 पथकांनी देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी धाड घातली होती. त्यानंतर लवकरच पुन्हा देशमुखांची चौकशी केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. 

    अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भाने ईडीने नागपुरातील सहा उद्योगपतींवर छापेमारी केली होती. हे सहा उद्योगपती अनिल देशमुख यांच्या आणि कुटुंबीयांसोबत व्यावसायिक भागिदारीत असल्याचा ईडीला संशय आहे. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी गुरुवारी 24 जून रोजी ईडीने डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवला आहे. अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. गेल्या 14 एप्रिलपासून अनिल देशमुखांची सीबीआय चौकशीही सुरू झाली आहे. सीबीआयने शंभर कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकोता येथे 2 बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडीही सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. गेल्या 25 मे रोजी ईडीच्या 3 पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

COMMENTS