Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इन्फंट इंडियातील मुलांना पालीत शिक्षणासाठी विरोध, सीईओंना दिले निवेदन

पाली गावातील नागरिकांनच्या मागणी धक्कादायक

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील पाली गावाजवळ असलेली जिल्हा परिषद शाळेत आहे.  इन्फंट इंडिया येथे पाचवीपर्यंत शाळा असतानाही तेथील विद्यार्थी पाली य

दोन खुनाच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा (Video)
सांगली शहरात बिबट्या घुसला
मुंबईतील मावा-मिठाई विकणार्‍या आस्थापनांची होणार तपासणी

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील पाली गावाजवळ असलेली जिल्हा परिषद शाळेत आहे.  इन्फंट इंडिया येथे पाचवीपर्यंत शाळा असतानाही तेथील विद्यार्थी पाली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांनी इन्पंट इंडिया येथेच शिक्षण घ्यावे, पालीच्या जि.प.शाळेत येऊ नये, यासाठी आज पाली येथील पालकांनी थेट जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले अन् सीईओंना निवेदन दिले.जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला. बीड तालुक्यातील इन्फंट इंडिया येथे एचआयव्हीग्रस्त मुले आहेत.
त्या मुलांसाठी इन्फंट इंडिया येथेच पाचवीपर्यंत शाळा आहे. तेथे दोन शिक्षकही कार्यरत आहेत. मात्र तरी देखील तेथील मुलं पाली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी येतात. पाली येथील पालकांनी ते इन्फंट इंडिया येथेच शिकावेत,पाली येथे येऊ नये याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र तरी देखील मुले पाली येथे शिक्षणासाठी येत असल्याने आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढत शाळेला कुलूप ठोकण्यात आले.याबाबत सीईओ अजित पवार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. जोपर्यंत इन्फंट इंडिया येथील विद्यार्थी तेथेच शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही पालीची शाळा बंद ठेवणार, असे दिलेल्या म्हटले आहे.यावेळी पाली गावातील नागरिकानि सि.ओ.अजित पवार यांना निवेदन देऊन विध्यार्थीयानि पाली येथील जिल्हा परिषद शाळेत येण्यास गावातील नागरिक,पालकांचा विरोध असून त्या मुलांमुळे आमच्या मुलाना त्रास होतो म्हणून जो पर्यंत ती मुलं येन बंद होत नाही तो पर्यंत आम्ही आमचे मुलं शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा घेतला आहे.  नये म्हणून निवेदन देण्यात आले.

COMMENTS