Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू

कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने अपघात 20 ते 25 जण जखमी

धुळे/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावरील अपघात ताजा असतांनाच मंगळवारी धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कंटे

चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू
स्वप्न अपूर्ण राहिलं..! लहान बहिणीला वनरक्षक भरतीसाठी घेऊन जाणाऱ्या सख्या बहीण भावांना ट्रक ने चिरडले
बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू

धुळे/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गावरील अपघात ताजा असतांनाच मंगळवारी धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. शिरपूर येथील पळासणेर येथील मध्यप्रदेश बॉर्डरवर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने ही अपघाताची घटना घडली. यावेळी कंटेनरने दोन वाहनांना देखील उडवले. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. यानंतर अग्नीशमन दल आणि पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. या अपघातात 10 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन बांधकाम साहित्य घेऊन जाणारा भरधाव कंटेनर चालला होता. धुळ्यातील पळासनेरजवळ ब्रेक फेल झाला. यानंतर कंटेनर अनियंत्रित झाला आणि रस्त्यावर उभ्या वाहनांना उडवत हॉटेलमध्ये घुसला. अचानक घडलेल्या या घटनेने महामार्गावर एकच हाहाःकार उडाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक लोक मदतीला धावून आले आणि लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली. सर्व मतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. मयतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतांचा आकडा 13 वर पोहचला आहे.

COMMENTS