Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?

मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. यानंतर राज

निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  
राज ठाकरेंकडे शिंदे गटाचा युतीचा हात ?
राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई/प्रतिनिधी ः अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणार यावे अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत उमटला आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात काल घडलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमी आपला पक्ष पुढे कसा न्यायचा याबाबत सोमवारी मनसेची बैठक झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे यावर चर्चा झाली. तसेच ती कशी लढायची यावर राज ठाकरेंनी नेत्यांचे मत जाणून घेतले. या बैठकीत उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असे मत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. याआधी 2017 च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे हात पुढे केला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून राज ठाकरेंकडे विनंती केली की आता वेळ बरोबर आहे. मराठी माणासांची अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावे अशी जनभावना आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, यावर विचार करायला हवा, अशी विनंती करण्यात आली. या बैठकीत उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असे मत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. मात्र राज ठाकरे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत विचारले असता आपण मेळाव्यात याबाबत भाष्य करु असे राज ठाकरे म्हणाले.

COMMENTS