Homeताज्या बातम्यामनोरंजन

गदर-2 मधील ‘उड जा काले कावा’ गाण्याचं नवे व्हर्जन रिलीज

चित्रपटातील मुख्य कलाकार सनी देओल आणि अमिषा पटेल चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. निर्मात देखील चित्रपट प्रमोशन करण्यात कोणतीही कसर ठेवत नाहीयेत. गदर

प्रवरेत स्टार्टअप प्रिझम फोरमची स्थापना  ः डॉ.शिवानंद हिरेमठ
सलमान खानच्या ‘या’ जवळच्या मैत्रिणीचे निधन
राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधीर जगताप

चित्रपटातील मुख्य कलाकार सनी देओल आणि अमिषा पटेल चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. निर्मात देखील चित्रपट प्रमोशन करण्यात कोणतीही कसर ठेवत नाहीयेत. गदर चित्रपटाची कथा आणि चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. असे असताना गदर २ मधील ‘उड़ जा काले कावा’ हे गाणे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. गदर 2 साठी उड जा काले कावा हे लोकप्रिय गाणे पुन्हा तयार केले गेले आहे. चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नवीन देखील या गाण्याचे मूळ गायक उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायले आहे. स्वर्गीय आनंद बक्षी यांचे मूळ गीत कायम ठेवण्यात आले आहे. दिल तो पागल है फेमच्या उत्तम सिंग यांनी मूळ गाणी रचली होती, तर मिथूनने नवीन गाण्याचे कॉम्पोजिशन आणि मांडणी केली आहे. तथापि, काही अलंकार वगळता, पहिल्या गाण्याचे सार आणि चाल तशीच ठेवण्यात आली आहे.स्वर्गीय आनंद बक्षी यांचे मूळ गीत कायम ठेवण्यात आले आहे. दिल तो पागल है- फेमच्या उत्तम सिंग यांनी मूळ गाणी रचली होती, तर मिथूनने नवीन गाण्याचे कॉम्पोजिशन आणि मांडणी केली आहे. तथापि, काही अलंकार वगळता, पहिल्या गाण्याचे सार आणि चाल तशीच ठेवण्यात आली आहे.गदर 2 मधील उड जा काले कावा या व्हिडिओमध्ये पहिल्या चित्रपटातील लीड्स, सनी आणि अमिषा, दोन दशकांपूर्वीचे त्यांचे प्रेम आठवत आहेत आणि आठवणी निर्माण करत आहेत. 2001 मधील चित्रपटातील मूळ व्हिडिओचा देखील यात सुंदर वापर करण्यात आला आहे. वर्मानातील स्किन आणि तारासिंग आपल्याला सहज भूतकाळात घेऊन जातात. यासाठी नवीन गाण्यात फोटो आणि दोघांच्या जुन्या वस्तूंचा वापर केला आहे. नवीन गाणे एका हिल स्टेशनमधील त्यांच्या नवीन घरी शूट करण्यात आले आहे. गाण्यात बॅकग्राऊंडला बर्फाच्छादित पर्वतांसह आहे. जिथे अमीषाची (सकीना), गाण्याच्या शेवटच्या भागात भांगडा करताना दिसते. तिने हट्ट केल्यावर सनीची (तारा) ही सहभागी होते. तर गाण्याच्या शेवटी तारा सिंग स्मशानात दिसत असून तो एका कबरीजवळ बसून रडत आहे. या गाण्यातील दोघांचा रोमान्स अप्रतिम आहे. तसेच सकीना निळे डोळे देखील लक्ष वेधून घेत आहेत.अनिल शर्मा दिग्दर्शित रोमँटिक अॅक्शन ड्रामा मूळ भारताच्या फाळणीच्या वेळी बनला होता. चित्रपट 2001 मध्ये रिलीज झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. या चित्रपटात दिवंगत अमरीश पुरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चित्रपटाची कथा अमृतसरमधील तारा सिंग या शीख ट्रक चालकाच्या भोवती फिरते, जो पाकिस्तानातील लाहोरमधील एका राजकीय कुटुंबातील सकीना या मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडतो. सीक्वलचा टीझर रिलीज होण्याआधी गदर पुन्हा रिलीज करण्यात आला होता. अनिल शर्मा दिग्दर्शित, गदर 2 मध्ये त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील मुख्य भूमिकेत आहे. उत्कर्षने पहिल्या भागात सनी आणि अमिषाच्या मुलाची भूमिका साकारली होती.

COMMENTS