Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दर्शनाच्या खूनातील कटर जप्त

राहुल हांडोरेच्या पोलिस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा झालेला खून अनेकांना चटका लावून जाणारा ठरल

एकाच कुटुंबातील 3 मुलांचा दुर्देवी मृत्यू
9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची सलमान खाननं घेतली भेट
तुमच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलो ः विवेक कोल्हे

पुणे/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा झालेला खून अनेकांना चटका लावून जाणारा ठरला होता, त्यानंतर आता आरोपीकडून दररोज वेगवेगळे खुलासे होत असून, आरोपी राहुल हांडोरेने दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने तिचा कंपास मधील कटरच्या साह्याने खून केला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून हे हत्यार जप्त केले आहे. या सोबतच राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना त्याने घातलेले कपडे देखील जप्त करण्यात आले आहेत.
पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दर्शना पवार हत्याकांडात आरोपी असलेला राहुल हांडोरेने दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने त्यांच्यात गडावर मोठा वाद झाला. यातुन रागाच्या भारत आरोपी राहुलने दर्शनावर आधी कंपासमधील कटरच्या साह्याने वार केले. आणि त्यानंतर तिचा दगडाने ठेचून खून केल्याची नुकतीच कबुली दिली. दर्शनाला मारतांना राहुलने क्रूरतेचा कळस गाठला होता. विवाहास नकार दिल्याने राहुलने दर्शनावर कंपासमधील कटरने तीन ते चार वेळा वार केले. त्यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला होता. पोलिसांनी या हत्याकांचा तपास करत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वस्तुंची माहिती घेत त्या जप्त केल्या आहेत. 18 जून रोजी दर्शना हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला 21 जून रोजी मुंबईत अटक करण्यात आली होती. राहुल सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याची पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राहुलने गुन्ह्यासाठी दोन शर्ट वापरले असून ते अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान, खून करून तो फरार झाला होता. यावेळी त्याला कुणी मदत केली का याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

COMMENTS