Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रियमंत्री रामदास आठवले शुक्रवारी बीड शहरामध्ये :पप्पू कागदे

बीड प्रतिनिधी - स्व.विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील स्मृतीस्थळावर दि. 30 जून शुक्रवार रोजी सकाळ

श्रीलंकेला प्रयान करण्यापूर्वी गौतमचा पत्रकारांशी गंभीर सामना
बेन्टेक्सच्या दागिन्यांवर दिले कोट्यवधीचे कर्ज ; नगर अर्बन शेवगाव शाखेतील 5 सोन्याच्या पिशव्या निघाल्या बनावट
प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा टीझर रिलीज

बीड प्रतिनिधी – स्व.विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील स्मृतीस्थळावर दि. 30 जून शुक्रवार रोजी सकाळी 11:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेसाठी रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले बीड शहरात येत आहेत. अशी माहिती युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील त्यांच्या स्मृतीस्थळावर शिवसंग्रामच्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेसाठी केंद्रीयमंत्री रामदास आठवले दि. 30 जून शुक्रवार रोजी बीड शहरात येत आहेत.तरी बीड शहरातील व बीड तालुक्यातील रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन युवा रिपाइंप्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.

COMMENTS