Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लव जिहादच्या निषेधार्थ नगरमध्ये रस्ता रोको    

अहमदनगर/प्रतिनिधी ः लव जिहाद कायदा संदर्भात व कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून लव जिहादमध्ये फसवून पळविलेल्या मुलाला व त्याच्या परिवाराला अटक

राहुरी तालुक्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
शासकीय योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये : तहसीलदार विजय बोरुडे
सात नंबर अर्ज भरणार्‍या सर्व शेतकर्‍यांना पाणी द्या

अहमदनगर/प्रतिनिधी ः लव जिहाद कायदा संदर्भात व कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून लव जिहादमध्ये फसवून पळविलेल्या मुलाला व त्याच्या परिवाराला अटक व्हावी यासाठी नगर शहर शिवसेनेच्यावतीने डीएसपी चौक येथे सोमवारी (5) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना अटक केली.                              
या बाबत ची माहिती अशी की कर्जत तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीस मुस्लिम युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांशी कर्जत पोलिसांनी उद्धटपणे वर्तन करून त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला त्याचबरोबर अल्पवयीन मुलीच्या चारित्र्याविषयी शंका निर्माण करून तिच्या पालकांना आरेरावीची भाषा केली. अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांच्या रोषामुळे अखेर कर्जत पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली. गुन्ह्याच्या फिर्यादीत संशयित तरुणाचे नाव घेतले नाही असा आरोप अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केला. तसेच अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्‍या संशयित तरुणाच्या नातेवाईकांनी अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना शिवीगाळ दमदाटी करून धमकी दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांनी न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. परंतु आमरण उपोषण सुरू करून तीन दिवस उलटले तरी अन्यायग्रस्त अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. असा आरोप अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केला. या आंदोलनामुळे नगर संभाजीनगर रोडवरील वाहतूक काही काळ थांबली. आंदोलनाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तातडीने आंदोलन स्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनास शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवासेना सहसचिव विक्रम अनिल राठोड, अरुण झेंडे, गौरव ढोणे, प्रशांत पाटील, गणेश झिंजे, संजय आव्हाड, सुनील भोसले, अजय भोईर, जेम्स आल्हाट, नरेश भालेराव, अनेक शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS