Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबरनाथमध्ये तब्बल सव्वा कोटींचा बोकड

अंगावर आहेत 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द

अंबरनाथ प्रतिनिधी - अंबरनाथमध्ये एका बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे. या बोकडाच्या अंगावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद'

 राष्ट्रीय सहकार धोरण आणि सरकारमुळे विकास प्रक्रियेत अधिक गतिमानता ः विवेक कोल्हे
राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काश्मीर टायगर्सवर बंदी घाला

अंबरनाथ प्रतिनिधी – अंबरनाथमध्ये एका बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे. या बोकडाच्या अंगावर ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असे शब्द असून, यामुळेच त्याच्या मालकाने त्याची किंमत १ कोटी १२ लाख ७८६ रुपये एवढी ठेवली आहे. हे बोकड विकूण येणाऱ्या पैशांतून गावी शाळा बांधण्याचे बोकड मालकाचे स्वप्न आहे. अंबरनाथच्या तहसील कार्यालयामागील सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा परिवारासह राहतो. स्टेशन रोडवर कपड्यांचा स्टॉल लावणाऱ्या शकीलला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड आहे. त्याच्या घरच्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झाले, त्याचे नाव त्यांनी शेरू असे ठेवले. या शेरूला लहानपणापासून अतिशय प्रेमाने वाढवत शकीलने मोठं केले. या बोकडाच्या मानेवर नैसर्गिकरित्या ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असे शब्द लिहिलेले आहेत.या बोकडाला फक्त दोन दात असून त्याचं वजन १०० किलो इतके आहे. शकीलने या बोकडाची किंमत १ कोटी १२ लाख ७८६ रुपये इतकी ठेवली आहे. हा बोकड रोज सकाळ संध्याकाळ सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका, हरभरा असे पदार्थ खातो. या बोकडाला विकून आलेल्या पैशातून उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी शाळा बांधण्याचे शकीलचे स्वप्न आहे.शकील याने या आधीही त्याचा एक बकरा विक्रीसाठी ठेवला होता. ज्याची किंमत १२ लाखांपर्यंत होती.

COMMENTS