Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज वकील संघाच्या वतीने प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश श्री.हेमंत महाजन यांना सेवापुर्ती निमीत्त निरोप समारंभ

केज प्रतिनिधी - केज वकील संघाच्या वतीने प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश हेमंत महाजन साहेब सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

केडगाव येथे महिलेस लोखंडी पाईपने मारहाण
 कल्याण शीळ रोड नागपूरच्या धर्तीवर डबल डेकर करणार – श्रीकांत शिंदे 
शेतकऱ्याला मज्जाव करणारा माॅल माजला ?

केज प्रतिनिधी – केज वकील संघाच्या वतीने प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधीश हेमंत महाजन साहेब सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.यासेवापुर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी न्या.एस.व्ही. पावसकर या होत्या.तसेच अंबाजोगाई येथील वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री.शिवदत्त पाटील यांची बदली झाल्याने त्यांनाही निरोप देण्यात आला.केज वकील संघाचे अध्यक्ष अड.महादेवराव लाड यांनी न्या.हेमंत महाजन यांचा सत्कार केला तसेच सौ.महाजन मडम यांचा सत्कार अड.रत्नजडीता मुंडे यांनी केला तसेच न्या.शिवदत्त पाटील यांचा सत्कार वकील संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर न्या.एस.व्ही.पावसकर मडम,न्या.ए.टी.जगताप मडम,न्या.निवडुंगेसाहेब,अड.महादेवराव लाड हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक अड.महादेव लाड यांनी केले तर सुञसंचालन अड.दिपक मुंडे यांनी केले.आपल्या प्रास्तविकपर भाषणात अड.महादेवराव लाड यांनी न्यायमुर्ती हेमंत महाजन साहेब यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत केज येथील जिल्हा सञ न्यायालयाच्या उभारणीमध्ये आपला सिंहाचा वाटा असुन आपले योगदान केज वकील संघ आयुष्यभर विसरणार नाही अशी ग्वाही दिली.दिनांक 11-06.2023 रोजी जिल्हा सञ न्यायालयाचे उदघाटन होत असुन आपली उणीव सदैव आम्हाला भासत राहील असे सांगितले.यावेळी अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष अड.कवडे साहेब किल्लेधारुर वकीलसंघाचे अध्यक्ष अड.मिश्रा साहेब यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.आभार अड.दिपक मुंडे यांनी मानले.

COMMENTS