Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चेअरमनपदी पाटील, उपाध्यक्षपदी प्रशांत सोळंके बिनविरोध

रेणापूर प्रतिनिधी - रेणा साखर कर्मचारी पतसंस्था म. दिलीपनगर निवाडा येथील संस्थेच्या चेअरमनपदी अण्णासाहेब पाटील, उपाध्यक्षपदी प्रशांत सोळंके पाटील

शाहू महाराजांमुळे संभाजीराजे छत्रपती यांची माघार
स्वाभिमानी करणार 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन
पाच जणांसह 190 मेंढ्यांचा मृत्यू

रेणापूर प्रतिनिधी – रेणा साखर कर्मचारी पतसंस्था म. दिलीपनगर निवाडा येथील संस्थेच्या चेअरमनपदी अण्णासाहेब पाटील, उपाध्यक्षपदी प्रशांत सोळंके पाटील व सचिवपदी राजेंद्र चौधरी यांची बिनविरोध झाली आहे. नुतन पदाधिका-यांचा रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर.आर आग्रे यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सचीवपदाची निवड बिनविरोध झाल्याचे घोषीत केले. माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी नुतन पदाधिकारी व संचालकाचा सत्कार करून नूतन पदाधिका-याना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आमदार धिरज देशमुख यांचा रेणा साखर कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात करुन आशर्विाद घेतले.

COMMENTS