शिर्डी/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या 80 किलोमीटर लांबीच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिं
शिर्डी/प्रतिनिधी ः समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या 80 किलोमीटर लांबीच्या दुसर्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आहे. यावेळी दोघांनीही कोनाशिलेचे अनावरण केले. त्यानंतर येथे उभारलेल्या व्यासपीठावर दीपप्रज्वलन केले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या महामार्गामुळे नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदरित्या कापता येणे शक्य होणार आहे. याचा फायदा मुंबई आणि आसपासच्या शहरातून शिर्डीला जाणार्या प्रवाशांना या महामार्गाचा लाभ होणार आहे. शिवाय शेतकर्यांनाही याचा फायदा होईल. नागपूरहून इगतपुरीपर्यंत आता नॉनस्टॉप प्रवास करता येणार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर, नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण 600 किमीचा रस्ता खुला झाला आहे. दरम्यान, प्रकल्पाचा पहिला टप्पा वाहनांसाठी खुला झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), राज्य वाहतूक पोलिस आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या नेतृत्वाखालील समितीने एमएसआरडीसीला काही जागा रंगवण्याची सूचना केली आहे. तसेच वाहन चालकांना सतर्क ठेवण्यासाठी पोलिस सायरनचा आवाज निर्माण करणारी उपकरणे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दुसर्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 कि.मी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणार्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर ह्या इंटरचेजपासून एस.एम.बी.टी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून ह्या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकर्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.
चौकट——–
मुझे रास्ते बनाने का शौक है
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या सहा ते आठ महिन्यांत संपूर्ण महामार्ग सुरू करू. तिसरा टप्पा थेट मुंबईपर्यंत जाईल असा माझा विश्वास आहे. रस्ते विकास विभागाचे मंत्री तेव्हा एकनाथ शिंदे होते व मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी समृद्धी महामार्गाचे स्वप्न आम्ही बघितले. राज्याचा विकास करायचा असेल तर मागास भाग राजधानी मुंबईला जोडणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रीन फिल्ड समृद्धी महामार्ग तयार करणे म्हणजे अनेक लोकांना स्वप्न वाटत होते. पण मला पूर्ण विश्वास होता तसा एकनाथ शिंदे यांनाही होता. मी आणि शिंदे लोकांना सांगत होतो की, मुझे रास्ते बनाने का शौक है, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.
7 मोठे पूल 30 भुयारी मार्ग – समृद्धी महामार्गावर 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र 11,12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसर्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये एवढा असून लांबी 80 कि मी आहे. या टप्याच्या उद्घाटनानंतर 701 कि.मी पैकी आता एकूण 600 कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
COMMENTS