Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजरत्न आंबेडकरांनी वैचारिक वारसा जपला ः आ. काळे

कोपरगाव शहरातील वश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे लोकार्पण

कोपरगाव प्रतिनिधी ः अस्पृश्यतेच्या आणि जातीयतेच्या अंधारात पडलेल्या कोट्यावधी लोकांचा उद्धार केल्यामुळे ‘युगपुरुष’, ‘महामानव’ आणि ‘अस्पृश्यांचा उ

कोपरगाव शहरासाठी 20 लाखाचे जिम साहित्य ःआ. आशुतोष काळे
ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा ः आ. आशुतोष काळे
साखर उद्योगाबाबत शाश्‍वत धोरणाची गरज ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी ः अस्पृश्यतेच्या आणि जातीयतेच्या अंधारात पडलेल्या कोट्यावधी लोकांचा उद्धार केल्यामुळे ‘युगपुरुष’, ‘महामानव’ आणि ‘अस्पृश्यांचा उद्धारक’ म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केला जातो. दलित चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अजोड असून त्यांच्या कार्याचा वारसा डॉ. राजरत्न आंबेडकर हे समर्थपणे पुढे चालवीत असल्याचे गौरवद्गार आ. आशुतोष काळे यांनी काढले. कोपरगाव शहरात बांधण्यात आलेल्या विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे लोकार्पण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी आ. आशुतोष काळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, डॉ. राजरत्न आंबेडकर त्यांच्या परिवाराच्या विचारांचा वारसा घेवून वाटचाल करीत असून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माध्यमातून भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डॉ. राजरत्न आंबेडकर भारतातील लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव व बुद्धिस्ट यंग फोर्सचे सल्लागार साहेबराव कोपरे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, डॉ. गोवर्धन हुसळे, महाराष्ट्र पतसंस्था असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, तहसीलदार विजय बोरुडे, शहरपोलीस निरीक्षक रामराव ढिकले, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, अ‍ॅड. भास्करराव गंगावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर, एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष रणधीर, के.जे. सोमैय्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य संतोष पगारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ. गोरक्षनाथ रोकडे, बाबासाहेब पगारे, रमेश घोडेराव, बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन, उपाध्यक्ष नितीन शिंदे, सचिव राहुल खंडीझोड, कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे, खजिनदार संजय दुशिंग, ज्ञानदेव दुशिंग, दादा जगताप, अ‍ॅड. नितीन पोळ, रमेश गवळी, अशोकराव शिंदे, सचिन शिंदे, प्रशांत कोपरे, रमेश मोरे, संजय कांबळे, मनोज शिंदे, राजेंद्र उशिरे, राजेंद्र पगारे, बुद्धिस्ट यंग फोर्सचे सर्व सदस्य आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, फिरोज पठाण, भोलू शेख, बाळासाहेब सोनटक्के, शकील खाटीक, दिनेश गायकवाड, गणेश बोरुडे, हारुण शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS