Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मस्तानी तलावात एक युवक पोहताना बुडून मृत्यू

दौंड / प्रतिनिधी पाट्स तालुका दौंड येथील पुणे सोलापूर महामार्गावर असणार्‍या मस्तानी तलावात पोहायला गेलेल्या एक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्य

हरितक्रांतीचे जनक थोर शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचं ९८ व्या वर्षी निधन
प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात हरघर तिरंगा घरघर तिरंगा उपक्रम साजरा
पुण्यातील 50 गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

दौंड / प्रतिनिधी पाट्स तालुका दौंड येथील पुणे सोलापूर महामार्गावर असणार्‍या मस्तानी तलावात पोहायला गेलेल्या एक युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली आहे..बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव शाहीद अन्सारी (वय-24 वर्षे )सध्या राहणार पाटस ता.दौंड जिल्हा-पुणे असे आहे. मात्र दहा तास उलटूनही या युवकाचा मृतदेह सापडला नसुन स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. पुणे सोलापूर महामार्ग लगत असलेल्या मस्तानी तलाव परिसरात असणार्‍या एका हॉटेल शेजारील टायर पंचर काढणार्‍या दुकानदारांची दोन तरुण मुले पोहायला शिकण्यासाठी टायरची ट्युब घेऊन मस्तानी तलावातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले असताना तलावात काही अंतरात गेल्यावर दोघेही त्या टायरच्या ट्युबवरून पाण्यात पडले असताना त्यातील एका तरुणाला थोडेफार पोहता येत असल्याने तो पोहत बाहेर आल्याने तो बचावला गेला आहे..
मात्र त्याचा जोडीदार शाहिद अन्सारी ला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला असल्याची माहिती त्याच्या बरोबर असलेल्या युवकाने ग्रामस्थांना दिल्याने ग्रामस्थांनी व युवकांनी तत्काळ तलावात उडी टाकून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र दहा तास उलटूनही त्याचा शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळतात पाटस पोलीस हवालदार संजय देवकाते,पोलीस शिपाई टकले यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील तरुणांनी मस्तानी तलावात त्या तरुणाचा शोध घेत आहे मात्र दहा तास उलटूनही मृतदेह शोधण्यात अपयश आले आहे.

COMMENTS