Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अ‍ॅड. काकडे यांच्याकडून मडके कुटुंबियांचे सांत्वन

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र मडके यांच्या मातोश्री राधाबाई रायभान मडके  (वय 80

नगर तालुक्यातील नागरदेवळे होणार लवकरच नगरपालिका
कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा – मंगेश पाटील
पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ठोकले शतक;याला जबाबदार कोण?

भातकुडगाव फाटा/प्रतिनिधी ः शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रवींद्र मडके यांच्या मातोश्री राधाबाई रायभान मडके  (वय 80 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले, या घटनेमुळे मडके कुटुंबियांना दुःखाचा डोंगर कोसळला असून जनशक्तीचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजीराव काकडे यांनी मडके कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांनी आपण मडके कुटुंबियांच्या दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे आहोतच या बरोबरच मडके कुटुंबियांशी असलेल्या अनेक जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.
तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हि आपल्या कुटुंबातीलच सदस्य असून सुख दुःखाच्या काळात प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचे काम काकडे कुटुंबियांकडून निरंतर होत राहणार असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती   माजी सभापती ड. अनिल मडके,  माजी सरपंच भाऊसाहेब राजळे, पंढरीनाथ राजळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील गवळी,  भागचंद कुुंडकर, महादेव तरसेे, मनोज घोंगडे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामचंद्र गिरम ,ड महेश आमले ,मेजर रमेश नरवडे, शेखर जोशी,  तसेच मडके परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

COMMENTS