शुद्ध मनाने काम केले तरच… पवारांनी दिला 8 मान्यवरांना सल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुद्ध मनाने काम केले तरच… पवारांनी दिला 8 मान्यवरांना सल्ला

आता हे परमेश्‍वरी कार्य म्हणूनच शुद्ध मनाने काम केले तरच परिस्थिती आटोक्यात आणता येणे शक्य आहे. यासाठी एखाद्या शिस्त लावणार्‍या उपाययोजना करण्याची गरज आहे.

राशीनमध्ये 710 किलो गोमांससह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
Ahnedmagar : नगरकरांनो कोरोनाची लस न घेणाऱ्यांना रेशनही मिळणार नाही | LokNews24
प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा

अहमदनगर/प्रतिनिधी- आता हे परमेश्‍वरी कार्य म्हणूनच शुद्ध मनाने काम केले तरच परिस्थिती आटोक्यात आणता येणे शक्य आहे. यासाठी एखाद्या शिस्त लावणार्‍या उपाययोजना करण्याची गरज आहे. शेवटी यंत्रणेला दुखावून काम करणे शक्य नाही. परंतु सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्नाची गरज आहे, असा सल्ला आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष व नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी राज्यातील 8 मान्यवरांना दिला आहे. 

आपण यासाठी प्रयत्न करीत आहातच, परंतु माझ्यासारख्या एका गावच्या सरपंचाला अनेक क्षेत्रातून येणार्‍या फोनमुळे हा पत्रप्रपंच करावा लागला, असे म्हणणे स्पष्ट नमूद करणारे पत्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पाठवले असून, कोविड-19 वर प्रभावी कार्यवाही करण्याची मागणी यात केली आहे.

कोरोना स्थितीची माहिती

पवार यांनी या पत्रात जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले की, सध्या कोरोनाची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून रेमडेसिविर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नाहीत, व्हेन्टीलेटर उपलब्ध नाहीत, पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे दवाखान्यातील रुग्णाला ऑक्सिजन मिळाला नाही तर भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. समाजाला जागविण्याच्यादृष्टीने इतर सर्व क्षेत्रातील ऑक्सिजन पुरवठा बंद करून फक्त दावाखान्यांसाठी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करावा. अन्यथा, अतिशय भयानक असे चित्र आपल्यासमोर असेल, अशी भीतीही पवारांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

COMMENTS