Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये गोवंश कत्तलखाने सुरूच

पोलिसांच्या कारवाईत 1 लाख 12 हजारांचे गोमांस जप्त

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री शहरातील जमजम कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल

उमेदवारी अर्ज पहिला कोण घेणार?…टॉसवर झाला निर्णय ; मनपा पतसंस्थेची निवडणूक पहिल्या दिवसापासून चर्चेत
व्हीडीओ कळीचा मुद्दा…जुन्या मनपात हायहोल्टेज ड्रामा ; जगताप-बोराटे-काळे आमने सामने
श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव सोहळा 15 ऑगस्टला

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री शहरातील जमजम कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे गोमांस ताब्यात घेतले आहे.
संगमनेर शहरातील अनधिकृत कत्तलखान्यांची राज्यभर ख्याती आहे. शेकडोने छापे टाकून देखील येथील कत्तलखाने बंद झालेले नाहीत. चोरी छूपके जमजम कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती. मथुरे यांनी या कत्तलखान्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस पथक मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात या कत्तलखान्याचा शोध घेत गेले असता एका ठिकाणी त्यांना गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे आढळून आले. राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असल्याने पोलिसांनी या ठिकाणाहून एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे गोमांस ताब्यात घेतले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल महादू किसन खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजीक रज्जाक शेख याच्या विरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम 269, 429 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ), 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.

COMMENTS