Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीतील शाळेत बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला आहे. शाळा प्रशासनाला सकाळी 7 वाजेच्या स

उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी ः राजू शेट्टी
जळगाव जामोद हादरले! कौटुंबिक वादातून जन्मदात्याचा क्रूर अंत; चार निष्पाप चिमुरड्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राज्यातील 110.39 लाख लाभार्थींना रक्कम रू. 23607.94 कोटी लाभ अदा

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला आहे. शाळा प्रशासनाला सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा मेल प्राप्त झाला. या माहितीनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून शाळा रिकामी करून घेतली. बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. शाळेत शोधमोहीम सुरू आहे. दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बची धमकी देणारा हा पाचवा मेल आहे. यापूर्वी इंडियन स्कूलला 2 मेल आले आहेत. मेल पाठवणार्‍यांबाबत आतापर्यंत  कोणतीही माहिती मिळालेली नाही. याशिवाय, मथुरा रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) या शाळेलाही 2 मेल आले होते. मात्र मेल करणारे दोघेही शाळेचे विद्यार्थीच निघाले होते. आता अमृता स्कूलला मिळालेला हा पाचवा मेल असून याचा तपास सुरू आहे.

COMMENTS