आंदोलनातून कोरोनाचे संकट पोचविणे हे नेतृत्वाचे लक्षण नव्हे ; मुख्यमंत्री ठाकरे यांची भाजपवर घणाघाती टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंदोलनातून कोरोनाचे संकट पोचविणे हे नेतृत्वाचे लक्षण नव्हे ; मुख्यमंत्री ठाकरे यांची भाजपवर घणाघाती टीका

कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. मागण्या आहेत हे मान्य आहे; पण सरकार जर तुमचे ऐकत असेल तर संघर्ष कशाला? सध्याच्या काळात मोठ्या संख्येने समाजाला रस्त्यावर उतरवायचे आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा अन् घरी जाताना जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचे हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनावर केला. 

प्रा. सोफियाँ मुल्ला यांना पीएचडी पदवी प्रदान
जात स्पष्ट करणारी आडनावे बदला…
नवनाथ महाराज काळे यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधीः कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. मागण्या आहेत हे मान्य आहे; पण सरकार जर तुमचे ऐकत असेल तर संघर्ष कशाला? सध्याच्या काळात मोठ्या संख्येने समाजाला रस्त्यावर उतरवायचे आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा अन् घरी जाताना जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचे हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनावर केला. 

कोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री हसन मुश्रीफ, शाहू महाराज, अशोक चव्हाण यांच्या उपस्थित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात मराठा समाजाने दाखवलेल्या संयमाबद्दल भाजपचे खासदार संभाजीराजे यांचे कौतुक केले. संभाजीराजे यांचे कौतुक करत असतानाच ठाकरे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला. कोरोनाचे संकट केवळ महाराष्ट्रावर नव्हे, तर जगावर आहे. आरक्षणाचा प्रश्‍न समोर आहे हे मान्य आहे; पण संघर्षाला रस्त्यावर उतरायचे, न्यायहक्कासाठी गर्दी करायची आणि जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचे हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही. खरा नेता तोच आहे जो समाजाचे रक्षण चहुबाजूंनी करतो. आर्थिक आरक्षण, राजकीय आरक्षण, नोकरीत आरक्षण हा जसा न्यायहक्क आहे, तसा समाजाच्या आरोग्याची चिंता वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली, ताकद दाखवली नंतर साथ पसरली तर ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळते, तोच खरा नेता असतो, असे ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजाला रस्त्यावर उतरू न देता अतिशय समजूतदारपणाने समाजाला शांत राहण्याचे आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांचे आभार मानले. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजूतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल, ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असं ते म्हणाले.

COMMENTS