Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जालिंधर बुधवत यांची निवड

बुलडाणा प्रतिनिधी - बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ,उपसभापती पदाची आज निवडणूक पार पडली. यामध्ये ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा प्रमुख

भंडारदरा येथुन पळवुन नेलेल्या मुलीचा खुन
डिलिव्हरी बॉयला महिलेकडून चपलेने मारहाण.
आदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवली

बुलडाणा प्रतिनिधी – बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती ,उपसभापती पदाची आज निवडणूक पार पडली. यामध्ये ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा प्रमुख असलेले जालिंधर बुधवत यांची सभापती तर काँग्रेसच्या आशा नंदकिशोर शिंदे यांची उपसभापती म्हणून निवड केली गेली. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे बारा संचालक हे निवडून आले होते. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडून ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष केला. 

COMMENTS