Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये अपघातात 6 जणांचा मृत्यू

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर-बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात एका चिमुकल्यासह 6 जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील अपघातात चार मित्रांचा मृत्यू
मोठी दुर्घटना ! ‘भगत की कोठी’ ट्रेनची मालगाडीला मागून धडक.
देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर-बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात एका चिमुकल्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडा पुलिया येथे ही अपघातीच दुर्घटना घडली. मृतांमध्ये 5 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पिकअपमधील लोक छठीचा कार्यक्रम उरकून परत येत होते. त्याचवेळेस जोरदार वेगात आलेल्या ट्रकने पिकअपला धडक दिली. त्या दुर्घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळीस शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS