Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड

राहुरीत प्रथमच सावकारकीचा गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्‍या खाजगी सावकाराच्या घरावर सहाय्यक निबंधक अधिकार्‍या

लग्नाला जाणारी वऱ्हाडीची गाडी कोसळली थेट दरीतl पहा LokNews24
कोतुळमध्ये पोलिस दलाचे पथ संचलन
राहुरी शहरात वाढले डासांचे साम्राज्य

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्‍या खाजगी सावकाराच्या घरावर सहाय्यक निबंधक अधिकार्‍याच्या पथकाने छापा टाकून घर झडतीत अनेक महत्वाची कागदपञे व कोरे धनादेश सापडले असुन हि सर्व कागदपञे जप्त करून त्याची चौकशी करण्यात आली.कागदपञाच्या आधारावरुन अवैध खाजगी सावकाराविरोधात राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. खाजगी सावकाराला गजाआड करण्यात आले आहे.राहुरी तालुक्यात प्रथमच  बेकायदेशीर सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           राहुरीतील सहाय्यक सहकार विभागाचे अधिकारी मुदिन शेख यांच्या फिर्यादीवरून भास्कर राजाराम बेलकर (वय 55, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) या बेकायदेशीर खाजगी सावकारावर राहुरी पोलिस ठाण्यात खाजगी सावकार  अधिनियमानुसार गुन्हा दाखल होणार आहे. याबाबत सविस्तर असे म्हैसगाव येथील शेतकर्‍यांनी खाजगी सावकाराकडून लाखो रुपयाची रक्कम व्याजाने घेतलेली होती. त्यांनंतर संबंधित शेतकर्‍यांनी सावकाराला मुद्दल व व्याजासह रक्कम परतावा केली होती. खाजगी सावकाराकडून अवासव्वा रक्कम वसुल करीत आसल्याने शेतकर्‍यांच्या तक्रारीबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेऊन राहरी येथील सहाय्यक निबंधक अधिकार्‍याच्या पथकाने दि. 9 मे 2023 रोजी म्हैसगाव येथील खाजगी सावकाराच्या घरावर छापा टाकला. यावेळी सहाय्यक निबंधक यांना खाजगी सावकाराच्या घरात 23 चेक, 14 कोरे व लिखित स्टॅम्प पेपर, गाड्या संदर्भात दोन कागदपत्रे (बोलेरो व दुचाकी), हस्तलिखित रकमेची नोंद असलेले आखीव आठ कागदपत्रे, 107 पेजेस वहीमध्ये ज्या लोकांना व्याजाने रक्कम दिली आहे अशांची नावे, रक्कम व तारीख असलेली वही, तीन खरेदी खत व उसनवार खरेदी पावत्या आढळून आल्या होत्या. या व्यतिरिक्तही अजूनही गौडबंगाल असलेचेही नागरिकांतून बोलले जात आहे. खाजगी सावकारावर प्रशासनाने छापा टाकूनही त्वरित कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना, प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारदार भीतीच्या सावटाखाली वावरत होते. तर त्यांना अनेकांकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकारही झाला. सावकार वेगवेगळ्या प्रकारे मध्यस्थीच्या माध्यमातून प्रकरण रफादफा कारण्याबाबतही हालचाली सुरू होत्या. अशा एकनाअनेक घटना पाच दिवसात घडल्या असल्याचे तक्रारदारांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. म्हैसगावातील आणखी 2 तसेच राहुरीतील 10 सावकार, देवळाली प्रवरातील 5 सावकार प्रशासनाच्या रडारवर आहेत.?राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस खाजगी सावकारांचे पेव वाढत चाललेले आहेत. अनेक नागरिक व शेतकरी सावकाराच्या जाचाला बळी पडत आहे. लवकरच म्हैसगाव येथील दोन सावकार व राहुरी शहरातील दहा सावकार तर देवळाली प्रवरातील 5 सावकार सहाय्यक निबंधक अधिकार्‍याच्या रडारवर असून लवकरच कायदेशीर कारवाई खाजगी सावकाराचा केली जाणार आहे.

…तर, पोलिसांशी संपर्क करा ः पोलिस निरीक्षक डांगे – नागरिकांनी स्वतःहून पुढे आले पाहिजे. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खाजगी सावकार एखाद्या व्यक्तीला सावकारकीच्या माध्यमातून दमबाजी करत असेल तर राहुरीचे पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्याशी संपर्क करावा असे त्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधी यांना स्वतःहा सांगितले आहे.

COMMENTS