देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य संघटक कवयित्री शर्मिला गोसावी यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना औरंगाबाद
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्य संघटक कवयित्री शर्मिला गोसावी यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांना औरंगाबाद येथील रमाई साहित्य चळवळीच्या वतीने रमाई गौरव पुरस्कार 2023 जाहीर करण्यात येत आहे अशी माहिती रमाई साहित्य संमेलनाच्या संयोजक तथा रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी दिली.
रमाई साहित्यिक चळवळ गेल्या तेरा वर्षापासून महिलांना लिहिते करण्याचे काम करीत आहे. आंबेडकरी महिलांना व्यक्त होण्यासाठी या चळवळीने हक्काचा मंच उपलब्ध करून दिला आहे. गेल्या दहा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना रमाई गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी 27 मे 2023 रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय,अहमदनगर येथे प्रसिद्ध कवयित्री, लेखिका दिशा शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या रमाई साहित्य संमेलनात लेखिका प्रतिमा परदेशी,विचारवंत ज.वि. पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार शर्मिला गोसावी यांना प्रदान करण्यात येणार आहे. शर्मिला गोसावी यांची बांगड्यांची खैरात, नजराणा,मनमित इत्यादी पुस्तके प्रकाशित असून काही प्रतिनिधी काव्यसंग्रहाचे संपादनही त्यांनी केलेले आहे.त्या वॉरियर्स फाउंडेशनच्या संस्थापिका असून प्रगतिशील लेखक संघ च्या प्रदेश सहसचिव आहेत. शब्दगंध, वाचकपीठ, वॉरियर्स च्या माध्यमातून साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्या सक्रिय सहभागी असतात. शर्मिला गोसावी यांना रमाई पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य शिवाजीराव देवढे,कविवर्य आमदार लहू कानडे,मराठी पञकार परिषदेचे सल्लागार मार्गदर्शक पञकार राजेंद्र उंडे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्राचार्य डॉ.जी. पी. ढाकणे,प्रा.डॉ.शंकर चव्हाण, ज्ञानदेव पांडूळे व शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदींनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS