Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. ते यश

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा
बायकोला लहान भावासोबत नको त्या अवस्थेत पाहिले मग बायकोनेच पतीला… | LOK News 24

पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि तत्कालीन पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंतही होते. ताकवले यांचा जन्म 11 एप्रिल 1933 रोजी हुरगुडे (जि. पुणे) येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव ताकवले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाले. कालांतराने वडिलांची पुण्याला पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे पुढील शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. तेथून त्यांनी 1956 मध्ये बी.एस्सी, आणि 1957 मध्ये पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यांनी भौतिकशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. 1978 ते 1984 या कालावधीत त्यांनी पुणे विद्यापीठाचे 11 वे कुलगुरू म्हणून पद भूषविले होते. त्यांनी संशोधन पदवी मास्को स्टेट विद्यापीठामधून प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

COMMENTS