Homeताज्या बातम्यादेश

अमृतसरमध्ये आठ दिवसात तिसरा बॉम्बस्फोट

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर आणखी एक स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली आहे. अमृतसरमध्ये 5 दिव

शाळेच्या जेवणात सापडली मृत पाल, 100 हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल
भाजपने आदिवासींना वनवासी केले – राहुल गांधी
शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ बुधवारी मध्यरात्रीनंतर आणखी एक स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली आहे. अमृतसरमध्ये 5 दिवसांत झालेला कमी-तीव्रतेचा हा तिसरा स्फोट आहे. याप्रकरणी पोलिसांनी दहशतवादी नेटवर्कशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एका दाम्पत्याचाही समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब बनवणारे नवखे होते आणि सुवर्ण मंदिराभोवती स्फोट घडवून पंजाबमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. तिसरा स्फोट कॉरिडॉरच्या बाजूला असलेल्या श्री गुरु रामदास सराईजवळ बुधवारी माध्यरात्रीनंतर 1 वाजता सुवर्ण मंदिराजवळ झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. मात्र, स्फोटाची ही जागा पहिल्या स्फोटाच्या ठिकाणापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. हा स्फोट पहिल्या घटनास्थळापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अमृतसर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी शनिवारी 6 मे रोजी सुवर्ण मंदिराच्या पार्किंगमध्ये बांधलेल्या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला होता. तेव्हा पोलिसांनी तो चिमणी स्फोट असल्याचे सांगितले. शनिवारच्या बॉम्बस्फोट प्रकरणात पंजाब पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. तडकाफडकी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने हा स्फोट रेस्टॉरंटच्या चिमणीच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगितले होते. यानंतर सोमवारी 8 मे रोजी दुसरा स्फोट झाला. यावेळी ही स्फोटके धातूच्या कप्प्यात ठेवण्यात आली होती आणि पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक धातूचे तुकडे जप्त केले. पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर करून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) द्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा संशय आहे. हेरिटेज पार्किंग लॉटमध्ये स्फोटक (बॉम्ब) टांगण्यात आले होते आणि तिथेच हा तिसरा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक एफएसएल पथकाने घटनास्थळी पोहोचून नमुने गोळा केले आहेत.

पोलिसांनी 5 जणांना घेतले ताब्यात – अमृतसरमध्ये स्फोटाची मालिका सुरुच आहे. या स्फोटानंतर पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी मंदिर परिसर चारही बाजूने सील केला. या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरु नगरी अमृतसरमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन स्फोटांच्या घटना घडल्या आहेत. या घटनांनंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. हे सर्वजण मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते. शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या सेवेदारांनी या आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. स्फोट केल्यानंतर आरोपी झोपले होते. संशय आल्यानंतर सेवेदारांनी या आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

COMMENTS