Homeताज्या बातम्यादेश

मिग-21 विमान कोसळून तिघांचा मृत्यू

वैमानिक सुखरुप ः राजस्थानमधील घटना

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानमधील हनुमानगड परिसरात सोमवारी सकाळी भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग-21 कोसळले. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ व

…गिरणी कामगारांच्या दिशेने
अंबड शासकीय आयटीआयमध्ये ३ नवीन व्यवसाय अभ्यासक्रमास मान्यता
पोहेगावच्या शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानमधील हनुमानगड परिसरात सोमवारी सकाळी भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान मिग-21 कोसळले. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला. एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. वैमानिक सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते.
मृतांमध्ये बाशोकौर रतन सिंग शीख (45), बंटो पलालसिंग राय सिंग (60), लीला देवी राम प्रताप (55) या तीन महिलांचा समावेश असून पायलट राहुल अरोरा (25) यांनी पॅराशूटने उडी मारून जीव वाचवला. पायलटला त्वरीत सुरतगडला पाठवण्यात आले आहे.

अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन केल्याचे हवाई दलाकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या हनुमानगड येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच विमान कोसळले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. विमानामध्ये दोन वैमानिक होते. मात्र त्या दोघांनी विमान कोसळण्यापूर्वीच उडी मारल्यामुळे दोघांचे प्राण वाचले. पण हे विमान घरावर कोसळल्यामुळे यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला असून एक पुरुष जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर विमानाने पेट घेतला. विमानाचे तुकडे गावाच्या अनेक ठिकाणी पडले असून विमान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य तातडीने सुरू केले असल्याची माहिती बहलोलनगरचे पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी दिली.

दीड वर्षात मिग-21 सात वेळा क्रॅश – मिग-21 विमान क्रॅश होण्याच्या घटनांत वाढ झाली असून, गेल्या 16 महिन्यात मिग-21 क्रॅश होण्याच्या घटना 7 वेळेस घडल्याचे समोर आले आहे. 5 जानेवारी 2021 रोजी सुरतगड, राजस्थान येथे अपघात झाला. या अपघातात पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.17 मार्च 2021 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ मिग-21 बायसन विमान कोसळले. या घटनेत आयएएफ ग्रुप कॅप्टनचा मृत्यू झाला होता. 28 जुलै 2022 रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे मिग-21 बायसन (प्रशिक्षक विमान) क्रॅश झाले होते. त्यात आग लागली आणि सुमारे अर्धा किलोमीटरच्या परिघात विमानाचे पार्ट विखुरले गेले होते. या अपघातात विमानातील दोन्ही पायलट शहीद झाले होते.

COMMENTS