Homeताज्या बातम्यादेश

फास्टॅग टोल वसुलीतून 193 कोटींचा महसूल

नवी दिल्ली : भारतात टोल वसुलीसाठी फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी म्हणजे सातत्यपूर्ण वाढीसह एक अभूतपूर्व यश आहे. 29 एप्रिल  रोजी, फास्टॅग प्रणालीद्व

भारतीय अर्थव्यवस्थेची वित्तीय तूट 6.20 लाख कोटींवर
व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई
गांधींच्या खुन्याचा जयजयकार?

नवी दिल्ली : भारतात टोल वसुलीसाठी फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी म्हणजे सातत्यपूर्ण वाढीसह एक अभूतपूर्व यश आहे. 29 एप्रिल  रोजी, फास्टॅग प्रणालीद्वारे एका दिवसात 1.16 कोटी व्यवहारांची नोंद होऊन 193.15 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक वसुलीद्वारे दैनंदिन टोल संकलनाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये फास्टॅग अनिवार्य केल्यापासून, फास्टॅग कार्यक्रमांतर्गत टोल प्लाझांची संख्या 770 वरून 1,228 पर्यंत वाढली आहे, ज्यात 339 राज्य टोल प्लाझांचा समावेश आहे. वापरकर्त्यांना सुमारे 97 टक्के प्रवेश दर आणि 6.9 कोटी पेक्षा जास्त फास्टॅग जारी करून, प्रणालीने राष्ट्रीय महामार्ग फी प्लाझा येथे प्रतीक्षा वेळ कमी करून वापरकर्त्यांना अधिक सुखकर अनुभव दिला आहे.महामार्ग वापरकर्त्यांनी फास्टॅगचा सातत्यपूर्ण आणि प्रगतीशील अवलंब केल्याने केवळ टोल कार्यान्वयनाची कार्यक्षमता वाढली नाही तर रस्ते मालमत्तेचे अधिक अचूक मूल्यांकन देखील झाले आहे, ज्यामुळे भारताच्या महामार्गाच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी गुंतवणूक आकर्षित झाली आहे. टोल संकलनातील परिणामकारकतेसोबतच, फास्टॅग ने संपूर्ण भारतातील 50 हून अधिक शहरांमध्ये 140 पेक्षा जास्त वाहनतळांवर पार्किंग शुल्कासाठी अखंड आणि सुरक्षित संपर्करहित देयक सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.सर्व रस्ते वापरकर्त्यांसाठी अखंड आणि त्रासरहित टोलिंगचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेवर सरकार कायम आहे. या संदर्भात, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारतात फ्री-फ्लो टोलिंग प्रणालीला परवानगी देण्यासाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आधारित टोलिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

COMMENTS